Saturday, May 4, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून - जन्मतारखेनुसार भविष्य..

किरोच्या नजरेतून – जन्मतारखेनुसार भविष्य..

सौ. वंदना अनिल दिवाणे

9 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य धनु आहे. आशावादी आहात परंतू आपले म्हणणे इतरांनी ऐकले पाहिजे असा तुमचा आग्रह असतो. संकटकाळात मदतीला धावून जाता. मनोबल व धैर्य अशावेळी जागृत होते. अ‍ॅडव्हेंचर फार आवडते. न पाहिलेल्या देशात प्रवास करणे ही तुमची महत्त्वाकांक्षा आहे. स्वतःच्या बौद्धिक कामापासून जास्त धनयोग होण्याचा संभव आहे.

- Advertisement -

10 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, गुरू, हर्शल या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. चेहरा सदैव हसरा व आनंदी असतो. आशावादी असल्याने संकटांना मुळीच घाबरत नाहीत. बोलण्यात उदारपणा स्पष्ट झळकतो. दुसर्‍यांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे आर्थिक स्थिती बिघडण्याची भिती आहे. फसवणूक होणार नाही. शेअर्ससारख्या व्यवहारात सावधान रहा.

11 डिसेंबर- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र नेपच्यून, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. स्वभाव सौम्य व आशावादी आहे.आत्मविश्वास कमी प्रमाणात आहे. भौतिक कार्यापेक्षा आध्यात्मिक कार्यात रस वाटेल. त्यामुळे गूढशास्त्राचे अध्ययन कराल. भावी घटनांची सूचक चाहूल लागेल. पैसे मिळवण्याचे आकर्षण वाटणार नाही पण बौद्धिक क्षमतेच्या जोरावर मोठे पद प्राप्त कराल. इतरांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न कराल.

12 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर रवि, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनुआहे. रवि आणि गुरू एकत्रित असल्यामुळे एक शक्तीशाली ग्रहयुती मदतीला आहे. एक उत्तम समन्वयक होणे चांगले जमेल. राजकीय चळवळीत यश मिळून अनेक पुरस्कार मिळतील. मोठ मोठ्या जबाबदार्‍या हाताळाव्या लागतील. उद्योगाचा प्रमुख म्हणून उत्तम प्रकारचे काम करता येईल. धार्मिक विषयाची आवड असेल. प्रगतीच्या काळात मिळालेला पैसा गुंतवणूक करून ठेवावा.

13 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, राहू, गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य धनु आहे. हुशार आहात. कार्यक्षेत्रातील विशेष गोष्टीवर बौद्धिकदृष्ट्या प्रभुत्व मिळेल. नवनवीन शोध लावणे तुम्हाला सहज शक्य आहे. साक्षात्कार होणे, भावी घटनांची चाहूल, विचित्र स्वप्ने अशा गोष्टी घडत असतात. पैसा हा विचित्र विषय आहे. मोठ्या प्रमाणावर पैसा येतो तो टिकवून ठेवणे शक्तीच्या बाहेर आहे. कुठून तरी अचानक मदत मिळेल.

14 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या नेपच्यून, बुध, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. बुधाचा प्रभाव फार मोठा व महत्त्वाचा राहील. बुद्धी अतिशय तीक्ष्ण, हुशार, हजरजबाबी आहात. काल्पनिकदृष्ट्या महत्वाकांक्षी आहात. मानसिक अस्वस्थेवर नियंत्रण मिळविल्यास यशाच्या शिखरावर पोहोचाल. उत्पन्नाच्या बाबतीत भाग्यवान आहात. गुंतवणूकीतून चांगला पैसा मिळेल. स्वतःच्या मनाप्रमाणे गुंतवणूक करावी.

15 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. गुरू-शुक्र युती ही फायद्याची आहे. हे ग्रह दोघांना पुरक आहे. सौंदर्याचे वेड आहे. अतिथी सत्काराची आवड आहे. सभोवती शांत वातावरण असावे असे वाटते. पैसा मिळवण्याची आवड असो वा नसो भाग्यवान असल्याने कमी वयातच विवाह व वारसाहक्काने मोठ्या प्रमाणावर पैसा मिळेल. वृद्धापकाळासाठी गुंतवणूक करावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या