Thursday, June 20, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

- Advertisement -

९ नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्‍चिक आहे. मंगळाला अंगारक म्हणतात. सर्व कृतीच्या मागे मंगळ अग्नी नेहमी प्रज्वलीत राहील. तुमच्या यशामुळे अनेक शत्रू निर्माण होतील. यांच्याकडून तुमच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता असल्यामुळे त्यासंबंधी जागरूक रहा. व्यवस्थापन कौशल्य चांगले राहील. सकारात्मक दृष्टीकोन असल्यामुळे हातून अनेक विधायक कार्य पार पडतील. प्रबळ इच्छाशक्तीमुळे अशा कार्यात सहज यश मिळेल. मातीचे सोने करण्याची कला अवगत असल्याने कोणत्याही कार्यक्षेत्रात विपूल धनप्राप्ती होईल.

१० नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, हर्षल, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्‍चिक आहे. मौलिकतेची दैवी शक्ती प्राप्त असल्यामुळे प्रयत्न केल्यास साहित्य, नाटक, प्रचारक म्हणून उत्तम यश मिळू शकेल. रंगभूमीवर कोणत्याही महत्त्वाकांक्षा नेहमी जागरूक राहील. नावलौकीक चांगला होईल. मौलिकतेमुळे तुमच्या कार्याल जनमानसात चांगला प्रतिसाद मिळाला तर प्रसिद्धीचा झोत तुमच्यावर राहील. आर्थिक बाबतीत उत्तम यश मिळेल. मात्र मिळवलेला पैसा टिकवणे जड जाईल.

११ नोव्हेंेबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र,नेपच्यून, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्‍चिक आहे. स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. घेतलेल्या निर्णयात वारंवार बदल केल्याने तोटा होण्याचा संभव आहे. कोणत्या कार्यक्षेत्रात काम करावे त्याचा निर्णय घेण्याच्या बाबतीत नेहमी तळ्यात मळ्यात चालू राहील. एकदा घेतलेल्या निर्णयात बदल करू नये. कल्पनाशक्ती चांगली असल्यामुळे कलेच्या क्षेत्रात चांगले यश मिळू शकेल. नेहमी आपल्या नादात गुंग असता. आर्थिक बाबतीत विशेष सतर्क राहणे आवश्यक आहे. वारसाहक्काने मिळालेली संपत्ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

१२ नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, मंगळया ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्‍चिक आहे. गुरू. मंगळ यांची युती अतिशय सामर्थ्य देणारी आहे. तिचा उपयोग केल्यास जीवनात उत्तम यश मिळवून समाजात महत्व निर्माण होईल. आत्मविश्‍वास दांडगा आहे. जबाबदारीचे कोणतेही काम चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. सुरूवातीच्या जीवनात अनेक अडथळे निर्माण होतील. त्यांना धैर्याने तोंड देऊन व पार करून आपले लक्ष्य गाठण्यात यशस्वी व्हाल यात शंका नाही. त्यामुळे तुमचा अनुभव दांडगा राहील. कोणत्याही करिअरमध्ये उत्तम धनप्राप्ती होईल.

१३ नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, सूर्य, मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्‍चिक आहे. हर्षल आणि मंगळ हे सूर्य मालिकेतील विध्वंसक ग्रह म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या एकत्रित येण्यामुळे तुमचे जीवन निश्‍चीतपणे इतरांपेक्षा हटके राहील. इतरांनी चोखाळलेला मार्ग करिअरच्या दृष्टीने आवडणार नाही. सुपीक बुद्धीमत्तेद्वारा नवीन मार्ग शोधून त्यातून प्रचंड यश मिळवून समाजात धमाल उडवून द्याल. तुमचे अभ्यासाचे विषयही वेगळे असतील. दुसर्‍यावर अवलंबून न राहता स्वतःच्या विचाराने तयार केलेल्या योजनातून चांगला पैसा मिळू शकेल.

१४ नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या मंगळ, बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्‍चिक आहे. बुधामुळे तुमच्या मंगळाचे सामर्थ्य बौद्धिकदृष्ट्या वाढलेले आहे. व्यवस्थापन कौशल्य भरपूर आहे. इतरांपेक्षा वेगळ्या वळणाने जाऊन निरनिराळ्या क्लृप्त्या काढून विपुल प्रमाणात धनप्राप्ती करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. सौंदर्याचे वेड असल्याने कलाक्षेत्रामध्ये जास्तच आपुलकी वाटेल. धनप्राप्तीच्या बाबतीत भाग्यवान आहात.

१५ नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंंगल, शुक्र या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास वृश्‍चिक आहे. शुक्र व मंगळ या दोन ग्रहांचे एकत्र येणे भाग्यकारक घटना आहे. पण कधी प्रेमाच्या बाबतीत निराशा पदरात पडण्याची शक्यता आहे. नातेवाईकदेखील मत्सराची भावना बाळगतील. त्यागी व परोपकारी वृत्तीमुळे जवळचे लोक तुमच्यावर प्रेम करतील. जीवनात सुरूवतीला अनेक अडथळे येतील. त्यामुळे लक्ष्यप्राप्तीस विलग होण्याची शक्यता आहे. मात्र एकदा गाडी रूळावर आली की, धनप्राप्तीचा ओघ शेवटपर्यंत सातत्याने सुरू राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या