Friday, March 28, 2025
Homeनगरलग्नाच्या आमिषाने युवकाची फसवणूक

लग्नाच्या आमिषाने युवकाची फसवणूक

अहमदनगर (प्रतिनिधी) – लग्नाचे आमिष दाखवून अविवाहित युवकाला युवतीने एक लाख 65 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात रेखा निलेश कदम (रा. वाशी, नवी मुंबई) या नावाच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, हनुमान मोहनराव काळे (वय- 30 रा. सारोळा ता. जामखेड) या युवकास 16 नोव्हेंबर 2018 ते 13 डिसेंबर 2019 दरम्यान रेखा कदम नावाच्या व्यक्तीने ऑनलाइन जीवनसाथी वेबसाइटवरून संपर्क केला. व्हाट्सअपद्वारे चॅटिंग करून लग्नाचे आमिष दाखवले व एक लाख 65 हजार रुपयांचे रोख रक्कम घेऊन काळे यांची आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हनुमान काळे यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात हनुमान काळे यांच्या फिर्यादीवरून रेखा कदम नावाच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण परदेशी हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सुपा उद्योगनगरी 5 वर्षांत वेगाने विस्तारणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सुपा-नगरसह जिल्ह्यातील उद्योग नगरींचा विकास आतापर्यंत पूर्ण क्षमेतेने होणे अपेक्षीत होते. त्यासाठी सर्वांनाच प्रयत्न वाढवावे लागतील. या भागात तंत्रज्ञान विकास आणि उद्योग...