Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशमहंगाई डायन खाए जात! पेट्रोल-डिझेलचे दर आजही कडाडले, डिझेलने केली शंभरी पार

महंगाई डायन खाए जात! पेट्रोल-डिझेलचे दर आजही कडाडले, डिझेलने केली शंभरी पार

दिल्ली | Delhi

- Advertisement -

देशांतील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीमुळे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर मागील चार महिन्यांहून अधिक काळ स्थिर होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (Crude Oil) भावाचा भडका उडूनही पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ टाळली होती. आता निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरांचा भडका वाढला आहे.

Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला ‘प्रार्थना’चा मोहक लूक, पहा फोटो

देशात आजहि पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आज प्रति लिटर ८० पैशांनी वाढले आहेत. गेल्या २२ मार्चपासून तब्बल नऊवेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. मागील ९ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर ६ रुपये ४० पैशांनी रुपयांनी वाढले आहेत. (Petrol Diesel price hike News)

रणरागिणीने बिबट्याशी शर्थीची झुंज देत वाचविले पतीचे प्राण

जाणून घ्या कोणत्या शहरात काय आहे दर?

मुंबई : पेट्रोल – ११६.७२ रुपये प्रति लिटर तर डिझेल १००.९४ रुपये प्रति लिटर

पुणे : पेट्रोल – ११६.५१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९९.२४ रुपये प्रति लिटर

अहमदनगर : पेट्रोल – ११६.६९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९९.४२ रुपये प्रति लिटर

नाशिक : पेट्रोल – ११७.०७ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९९.७८ रुपये प्रति लिटर

औरंगाबाद : पेट्रोल – ११६.८१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९९.५३ रुपये प्रति लिटर

कोल्हापूर : पेट्रोल – ११७.१९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९९.९२ रुपये प्रति लिटर

नागपूर : पेट्रोल – ११६.४० रुपये प्रति लिटर तर डिझेल ९९.१७ रुपये प्रति लिटर

Amruta Khanvilkar : ‘अप्सरा हो तुम, या कोई परी’! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

- Advertisment -

ताज्या बातम्या