Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशइंधनाचा भडका! १५ दिवसांत जवळपास १० रुपयांची वाढ, जाणून घ्या नवे दर

इंधनाचा भडका! १५ दिवसांत जवळपास १० रुपयांची वाढ, जाणून घ्या नवे दर

दिल्ली | Delhi

मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा (Fuel Price Hike) धडाका सुरू आहे. या इंधन दरवाढीने जनतेची होरपळ सुरू झाली आहे. मागील १५ दिवसांत इंधनवाढीमध्ये तब्बल १३ वेळा दरवाढ झाली. त्यामुळे या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर जवळपास १० रुपयांनी वाढ झाली आहे. (Petrol, Diesel Prices Hiked Again)

- Advertisement -

Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळा, कुणी कोरलं नाव?, पाहा विजेत्यांची यादी

आजही पेट्रोल-डिझेल प्रत्येकी ८० पैशांनी महाग झाले. पेट्रोल-डिझेलच्या दरांत सातत्यानं होणाऱ्या दरवाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसत आहे. तसेच, देशाची आर्थिक राजधामी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. मुंबई पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ८४ आणि ८५ पैशांची वाढ झाली आहे.

अनिल अंबानींनी ‘या’ दोन मोठ्या कंपन्यांचे संचालकपद सोडले… काय आहे कारण?

जाणून घ्या कोणत्या शहरात काय आहे दर?

दिल्ली : पेट्रोल – १०४.६१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९५.८७ रुपये प्रति लिटर

मुंबई : पेट्रोल – ११९.६७ रुपये प्रति लिटर तर डिझेल १०३.९२ रुपये प्रति लिटर

पुणे : पेट्रोल – ११९.०७ रुपये प्रति लिटर तर डिझेल १०१.७८ रुपये प्रति लिटर

अहमदनगर : पेट्रोल – ११९.७५ रुपये प्रति लिटर तर डिझेल १०२.४४ रुपये प्रति लिटर

नाशिक : पेट्रोल – ११९.११ रुपये प्रति लिटर तर डिझेल १०१.८३ रुपये प्रति लिटर

परभणी : पेट्रोल – १२२.०१ रुपये प्रति लिटर तर डिझेल १०४.६२ रुपये प्रति लिटर

कोल्हापूर : पेट्रोल – ११९.६९ रुपये प्रति लिटर तर डिझेल १०२.४१ रुपये प्रति लिटर

नागपूर : पेट्रोल – ११९.३३ रुपये प्रति लिटर तर डिझेल १०२.०७ रुपये प्रति लिटर

औरंगाबाद : पेट्रोल – ११९.९७ रुपये प्रति लिटर तर डिझेल १०२.६५ रुपये प्रति लिटर

Amruta Khanvilkar : ‘अप्सरा हो तुम, या कोई परी’! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

- Advertisment -

ताज्या बातम्या