Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेश'या' तारखेपासून चित्रपटगृह १०० टक्के क्षमतेने सुरू होणार

‘या’ तारखेपासून चित्रपटगृह १०० टक्के क्षमतेने सुरू होणार

दिल्ली l Delhi

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील चित्रपटगृहे मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत ठराविक प्रेक्षकांच्या संख्येसह चित्रपटगृहे सुरू करण्यात आली होती. मात्र आता सरकारने प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

केंद्र सरकारने चित्रपटगृह, मल्टीप्लेक्ससाठी नवीन गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. यानुसार आता, १ फेब्रुवारी २०२१ पासून चित्रपटगृह संपूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने जरी संपूर्ण क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली असतील तरी प्रेक्षकांना आणि मल्टिप्लेक्स मालकांना करोना संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या गाईडलाईन्सनुसार चित्रपटगृहांच्या आत आणि कॉमन एरियामध्ये प्रेक्षकांना ६ फुटांचं अंतर ठेवावं लागणार आहे. तसंच चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि प्रेक्षक बाहेर पडणाऱ्या ठिकाणी सॅनिटायझर असणंदेखील बंधनकारक करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त चित्रपटगृहांमध्ये थुंकण्यास बंदी असेल. चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणंदेखील बंधनकारक करण्यात आलं आहे. १ फेब्रुवारीपासून देशातील सर्व चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेसह सुरु होणार आहेत.

याव्यतिरिक्त पार्किग लॉट आणि चित्रपटगृहांच्या जवळपास गर्दी नियंत्रित करण्यासही सांगण्यातआलं आहे. पार्किगमध्येदेखील सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं अनिवार्य करण्यात आलं आहे. लिफ्टमध्येदेखील अधिक लोकांना प्रवेश देणं टाळण्याच्या सूचना सरकारनं केल्या आहेत. याशिवाय कॉमन एरिया, लॉबी आणि शौचालयांमध्ये इंटरवलच्यावेळी गर्दी जमू नये याची चित्रपटगृहांना काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच इंटरवलमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या जागेवरून न उठण्याच्या सूचनादेखील केल्या जाऊ शकतात.

आता केंद्र सरकारने संपूर्ण १०० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली असली आहे मात्र, आता राज्यातील चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास ठाकरे सरकार परवानगी देणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या