Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याहवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मनपाला 'इतक्या' कोटींचा निधी

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मनपाला ‘इतक्या’ कोटींचा निधी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार हवेची गुणवत्ता राष्ट्रीय वातावरणीय वायु गुणवत्ता मानकांपेक्षा कमी असलेल्या शहरांची संख्या भारतात 122 आहे. त्यात महाराष्ट्रातील 17 शहरांचा समावेश आहे. नाशिक त्यातील एक शहर आहे. शहराच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘एनकॅप’अंतर्गत नाशिक महापालिकेला 91.32 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय वातावरणीय वायु गुणवत्ता मानकांमध्ये गेल्या पाच वर्षांपेक्षा कमी आहेत अशा शहरांची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. नाशिकचा समावेश त्यात करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वच्छ वायू कृती आराखडा अंमलबजावणीसाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाशिक महापालिकेचा ऑक्टोबर 2019 मध्ये आराखडा मंजूर केला. त्यात नाशिकसह, देवळाली कॅन्टमेंट बोर्ड आणि भगूर नगरपरिषद यांचा समावेश करण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘एनकॅप’अंतर्गत नाशिक महापालिकेला शहर परिसरासोबतच कॅन्टोन्मेन्ट बोर्ड व भगूर नगर परिषद हद्दीच्या विकासासाठी 91.32 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून मनपाच्या विविध उपक्रमांसाठी 87.01 कोटी रुपये, देवळाली कॅन्टोमेन्टसाठी 3.64 कोटी रुपये तर भगूर नगर परिषदेसाठी 67 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

या माध्यमातून शहराच्या शुध्द हवा गुणवत्ता विकासात शहरातील पंचवटी (3.70 कोटी), नाशिक रोड (3.76कोटी) व नविन नाशिक (3.83 कोटी) या तीन ठिकाणी विद्यृत दाहिन्या उभारणीचे काम गतिमान करण्यात आले आहे.

या तीनही ठिकाणी कामांना प्रारंभ करण्यात आले आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी 4 यांत्रीकी झाडू खरेदी केले जाणार आहेत. त्यांची किंमत ही 11.96 कोटी रुपये आहेत. त्याला राज्य शासनाने मंजूरी दिली असल्याने खरेदी प्रक्रिया सूरू करण्यात आलेली आहे. वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे. पूढील 4 महिन्यात प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

शहरात उभारलेल्या सुलभ शौचालयांच्या छतावर सोलर यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. त्यातून मनपा वीजनिर्मिती करणार आहे. यासाठी 2 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. त्यांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून विजेची गरज भागवण्याचे प्रयोजन आहे. यासोबतच शहराच्या प्रदूषणमुक्तीसाठी 50 इ-बसेस घेण्याचे निर्धारित करण्यात आलेले आहे. त्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी आरक्षित ठेवण्यात आला आहे.पहिल्या 25 बसेस खरेदी करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या