सौ. वंदना अनिल दिवाणे
जन्मतारखेनुसार भविष्य…
30 जुलै –
वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरु, रवि, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास सिंह आहे. तुम्ही फार स्वतंत्र बाण्याचे आहात. निडर व धाडसी आहात. त्यामुळे समोरच्याच्या तोंडावर त्याचे दोष सांगण्यास कमी करणार नाही. हाताखालच्या लोकात जितके लोकप्रिय आहात तितकी वरिष्ठांची मर्जी प्राप्त होत राहील. स्वतः पुढे होऊन कामाची जबाबदारी आपल्या अंगावर घ्याल. ते तितक्या कौशल्याने पूर्ण करून दाखवाल. बौद्धिक क्षमता उच्च प्रकारची असल्यामुळे विचारांची पातळीही उच्च राहील. आर्थिक स्थितीच्या बाबतीत भिण्याचे कारण नाही. आयुष्याच्या पूर्वार्धात पेरलेले कष्टाचे बीज उत्तरार्धात फळून येईल.
31 जुलै –
वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. स्वभाव इतरांपेक्षा फार वेगळा आहे. त्यामुळे इतरांशी व परिस्थितीशी जुळवून घेणे फार कठीण जाईल. तुमचे विचार व कल्पना मौलिक असल्यामुळे लोकांना त्या पटणार नाहीत, तुमचा स्वभाव अतिशय संवेदनशील असल्यामुळे इतरांच्या बोलण्याचा स्वतःशी निगडीत भलताच अर्थ काढून उगीचच अस्वस्थ व्हाल. कौटुंबिक व नातेवाईक यांच्याशी जमवून घेणे फार कठीण जाईल. आर्थिक बाबतीतही विचित्र स्वभावामुळे सहकार्यांशी मुळीच जमणार नाही. म्हणून आर्थिक निर्णय स्वतःच घेऊन एकटेपणाने केलेली गुंतवणूक फायद्याची राहील.
1 ऑगस्ट –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. बुद्धी तर तीव्र आहे. शिवाय विचारांची झेप अमिशय वेगवान आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. उद्योगशीलता व संमोहित करणारे व्यक्तिमत्त्व यांच्या आधारे आपली महत्त्वाकांक्षा निश्चितपणे पूर्ण कराल. मग ते कार्यक्षेत्र कोणते का असेना तरीही शासकीय अधिकारी नगरपालिका किंवा कोणत्याही प्रकारच्या सामाजिक कामामध्ये जास्त यश मिळेल. हर्षलच्या प्रभावामुळे जीवनाशी संबंधित भावी घटनांची अगोदर चाहूल लागेल. आर्थिक बाबतीत भाग्य चांगले साथ देईल. काही काळ कष्टाचा व अडचणीचा जाईल. पण त्याच जोरावर पुढील आयुष्यात धनी लोकात गणना होईल.
2 ऑगस्ट –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौकट अशी आहे, की बौद्धिक व सामाजिक क्षेत्रात महत्त्व प्राप्त होईल. आत्मविश्वास दांडगा असून अनेक लोकांचा विश्वास संपादन करू शकाल. प्रगतीच्या संधी नेहमी वाट पाहत असतील. कला, साहित्य, संगीत व नाटक या क्षेत्रांत चांगले यश मिळू शकेल. वागण्यातील चलाखी व मुत्सद्देगिरी यामुळे व्यवस्थापनात उत्तम यश मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्ही फार भाग्यवान आहात. धनप्राप्ती विविध मार्गांनी होईल.
3 ऑगस्ट –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, रवि, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. महत्त्वाकांक्षा हे तुमचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सध्या यशाने तुमचे समाधान होणार नाही. आयुष्यात मोठी झेप घ्याल. महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर आरुढ होण्याची इच्छा पूर्ण होईल. कोणतेही काम अंगावर घेतले की, रात्रंदिवस कष्ट करून मन एकाग्र करून पूर्ण कराल. आदर्शवादाचे आकर्षण वाटेल. दैवी शक्ती प्राप्त असल्याने कशात फायदा आहे याचा अंदाज अगोदरच येईल. आर्थिक बाबतीत भाग्य चांगले साथ देईल.
4 ऑगस्ट –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, रवि, या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. विचार व कृतीतून स्वतंत्र बाणा इतरांना दिसून येईल. घेतलेल्या कामाची घेतलेली जिम्मेदारी यशस्वी रीतीने पार पाडून दाखवाल. काही निवडक लोकांनाच बरोबर घेऊन लक्ष गाठाल. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाला विशेष झळाळी प्राप्त होईल. सबुरी, श्रद्धा लक्षात ठेवावी. पैशात असलेल्या शक्तीचे जास्त आकर्षण असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात प्राप्त कराल.
5 ऑगस्ट –
वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, बुध, सूर्य या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौकट बौद्धिक क्रांतीच्या दृष्टीने फारच चांगली आहे. त्यामुळे दुसर्याच्या मानसिक स्थितीचे लवकर निदान होते. त्यातून लवकर राग येणे, उतावळेपणा, लवकर निर्णय घेणे हे दोष स्पष्ट होतात. स्वभाव अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. बुध आणि हर्षल ग्रहामुळे नावीन्याचा सोस राहील. प्रवासाची आवड वाटेल. विलक्षण बुद्धिमत्तेतून निर्माण झालेल्या नवनवीन योजना पैशाचा महापूर निर्माण करतील. लबाड सहकार्यांचा सहभाग टाळला पाहिजे.