Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशG-20 Summit India: 200 तास चर्चा, 300 बैठका, 15 मसुदे; जी-२०चे पुढचे...

G-20 Summit India: 200 तास चर्चा, 300 बैठका, 15 मसुदे; जी-२०चे पुढचे अध्यक्षपद ब्राझीलकडे

नवी दिल्ली | New Delhi

राजनैतिक व्यासपीठावरील आणखी एका विजय मिळवत, भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यान (G-20 Summit) नवी दिल्ली घोषणापत्र जारी करण्याचा करार झाला. कोणतीही परिषद तेव्हाच यशस्वी मानली जाते, जेव्हा जाहीरनामा (Manifesto Ready) जारी केला जातो आणि या जी-२० जाहीरनाम्याची खास गोष्ट म्हणजे, त्यावर १०० टक्के एकमत होते. रशिया-युक्रेन युद्धाची किंवा चीनचा यावर काहीही परिणाम पडला नाही. दरम्यान, जी-२० शेरपा अमिताभ कांत (Amitabh Kant) यांनी X वर एक पोस्ट शेअर केली असून त्यांच्या टीममधील दोन सदस्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की,संयुक्त सचिव एनम गंभीर आणि के नागराज नायडू यांच्यासह राजनयिकांच्या पथकाने ३०० द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि जी-२० नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी करारावर पोहोचण्यासाठी वादग्रस्त युक्रेन संघर्षावर त्यांच्या समकक्षांसह १५ मसुदे वितरित केले.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची सपत्नीक अक्षरधाम मंदिराला भेट

कांत यांनी सांगितले की, नायडू आणि गंभीर यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना खूप मदत झाली. ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशिया सारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी या यशापर्यंत पोहोचण्यात आघाडीची भूमिका बजावली. युक्रेन संघर्ष आणि हवामान बदलाशी निगडित मतभेदांमुळे सहमती गाठण्याची आव्हाने पाहता जी-२० ने नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारणे हा भारताचा मोठा विजय म्हणून पाहिला जात आहे.

नवी दिल्ली घोषणापत्र स्वीकारल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “माझ्याकडे चांगली बातमी आहे, आपल्या टीमच्या कठोर परिश्रमामुळे, नवी दिल्ली घोषणापत्रावर जी-२० नेत्यांचे एकमत झाले आहे. मी या घोषणेचा अवलंब करत असल्याची घोषणा करतो. या निमित्ताने मी आमच्या शेरपांचे, मंत्र्यांचे अभिनंदन करतो, ज्यांनी यासाठी कठोर परिश्रम केले आणि हे शक्य करून दाखवले.”

G20 leaders at Rajghat : जगभरातील नेते राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक

“आम्ही सर्व देशांना प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि शांतता आणि स्थिरतेचे रक्षण करणारी बहुपक्षीय प्रणाली, यासह आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचे समर्थन करण्याचे आवाहन करतो,” असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

तर, काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही सध्याच्या जागतिक परिस्थितीमध्ये जी-२० नेत्यांच्या संयुक्त संभाषणावर एकमत निर्माण केल्याबद्दल जी-२० शेर्पा अमिताभ कांत यांचे कौतुक केले. थरुर यांनी X अकाउंटवर म्हटले की, “जी-२० मध्ये भारतासाठी हा “गर्वाचा क्षण” आहे. खुप छान अमिताभ कांत! जी-२० मध्ये भारतासाठी अभिमानाचा क्षण!”

पुढील जी-२० परिषद ब्राझीलमध्ये

जी-२० शिखर परिषदेचे तिसरे आणि अखेरचे सत्र सुरू झाले आहे. सत्राच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलकडे पुढचे अध्यक्षपद सोपवले. ब्राझीलचे राष्ट्रपती लुइज इनासियो लुला डा सिल्वा यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. जी-२० अध्यक्षपद सोपवताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या राष्ट्रपतींचे अभिनंदन केले.

पुढच्या वर्षी जी२० संमेलन ब्राझीलमध्ये होणार आहे. बैठक सुरू होण्याआधी जी-२० परिषदेचे गेल्या वर्षीचे अध्यक्ष इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो आणि पुढच्या वर्षीचे अध्यक्ष लुइज यांनी सध्याचे जी२० अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक रोपटे भेट म्हणून दिले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या