Friday, June 21, 2024
Homeदेश विदेशजी-२० परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांची दिल्लीत उपस्थिती; मोदींचे कौतुक ते ऋषी सुनक यांच्यासोबतच्या फोटोची...

जी-२० परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांची दिल्लीत उपस्थिती; मोदींचे कौतुक ते ऋषी सुनक यांच्यासोबतच्या फोटोची चर्चा

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

जी-२० परिषदेसाठी (G-20 Summit) देशाच्या राजधानीत जागतिक नेत्यांची मांदियाळी जमली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन (Joe Biden) आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह अनेक मोठे नेते दिल्लीतील जी-२० परिषदेत सहभागी झाले आहेत. भारतात आलेल्या या खास पाहुण्यांचे भारतीय शिष्टाचार पद्धतीने पाहुणचारही केला जात आहे. या कार्यक्रमासाठी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

त्यामुळे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (CM Eknath Shinde) या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले होते. या विशेष डिनरसाठी उपस्थित राहण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जी २० देशांची १८ वी शिखर परिषद दिल्लीत पार पडत आहे. या परिषदेसाठी जगभरातील राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना आमंत्रण देण्यात आलेले आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी देखील या परिषदेत सहभागी होत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. याचबरोबर, आपल्याला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळणे ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.

आपल्या देशाचे नाव जगभरामध्ये मोदींच्या नेतृत्वात सन्मानाने घेतले जातेय याचाही अभिमान आहे. आपल्या देशाची प्रगती, अर्थव्यवस्था, चांद्रयान तीनचे यशस्वी उड्डाण यामुळे देशाचे नाव लौकिक होत आहे. जगभरातील अर्थव्यवस्था डगमगळीत झालेली असताना आपण दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली आहे.

भारत विरुध्द पाकिस्तान आज सुपर फोरसाठी पुन्हा भिडणार

अशा अनेक विकासाचे प्रकल्प गेल्या नऊ वर्षांत मोदींच्या मार्गदर्शनामध्ये झाले आहेत. त्यामुळे देशाचे नाव उज्ज्वल झालेय. जी-२० साठी जगभरातील नेते पहिल्यांदा भारतात आले आहेत. असे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडतेय, हे नमूद करु इच्छितो”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची देखील भेट घेतली. या भेटीचा फोटो एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत पर्यावरणमंत्री अश्विनी कुमार चौबे हे देखील दिसून येत आहेत.

दरम्यान, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परदेशी पाहुण्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव, चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी एकूण १७० जणांना निमंत्रण देण्यात आले होते. परदेशी नेते आणि शिष्टमंडळांच्या प्रमुखांव्यतिरिक्त सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, कॅबिनेट आणि राज्यमंत्री, केंद्र सरकारचे सचिव आणि इतर मान्यवर पाहुण्यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रण होते. महत्त्वाचे म्हणजे, अनेक पाहुण्यांनी या कार्यक्रमासाठी पारंपरिक वस्त्रे परिधान केली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या