नवी दिल्ली | New Delhi
भारताची राजधानी दिल्लीत येत्या शनिवारी व रविवारी (९-१० सप्टेंबर) जी-२० शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला जगभरातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही उपस्थित राहणार आहेत. मात्र, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) या बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.
मी भारतामध्ये जाण्यासाठी भारत भेटीसाठी उत्सुक आहे. परंतु चीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये सहभागी होत नसल्यामुळे मी निराश आहे असे पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले.
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, बायडेन ७ सप्टेंबरला (गुरुवारी) भारतात येणार आहेत. ८ सप्टेंबर रोजी शिखर परिषदेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे.
Maratha Andolan : “विरोधकांकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न, ‘तो’ आरोप सिद्ध केला तर…”, अजित पवारांचे विरोधकांना आव्हान
राजधानी दिल्लीत पार पडणाऱ्या जी-२० शिखर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला-द-सिल्वा आदि नेते उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी जी-२० लीडर्स समितीचे विशेष सचिव मुक्तेश परदेशी यांनी सांगितले शिखर परिषदेतील सहभागाबाबत अद्याप लेखी पुष्टीकरणाची प्रतीक्षा आहे. काही रिपोर्टेस मध्ये असे म्हटले आहे की, ते दिल्ली येथे येणार नाही याबाबत परदेशी म्हणाले की, आम्ही हे फक्त वर्तमानपत्रात पाहिले आहे. मात्र लेखी खात्रीच्या आधारेच काम करतो. ते अद्याप आम्हाला मिळाले नाही. यावर काहीही सांगता येणार नाही.