Monday, June 9, 2025
HomeमनोरंजनGadar 2 teaser : तारा सिंग इज बॅक...! बहुप्रतिक्षित 'गदर 2'चा दमदार...

Gadar 2 teaser : तारा सिंग इज बॅक…! बहुप्रतिक्षित ‘गदर 2’चा दमदार टीजर प्रदर्शित

मुंबई | Mumbai

- Advertisement -

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट जेव्हा २००१ मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा बॉक्स ऑफिसवर नवीन इतिहास रचला गेला होता. यामध्ये सनी देओल, अमिषा पटेल, अमरिश पुरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता तब्बल २२ वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘गदर २’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये तारा सिंगच्या भूमिकेतील सनी देओलची जबरदस्त झलक पहायला मिळत आहे. १९७१ च्या काळात भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी या सीक्वेलच्या कथेला देण्यात आली आहे.

Accident News : शनी भक्तांवर काळाचा घाला! भीषण अपघातात चार ठार

२००१ साली आलेल्या ‘गदर’ मध्ये सनी देओलने हँडपंप उचलला होता. तर आता ‘गदर २’ मध्ये सनी पाजी चक्क बैलगाडीचं चाकच गरगर फिरवताना दिसतोय. जावई आहे तो पाकिस्तानचा, त्याचं स्वागत करा, टीका लावा नाहीतर यावेळी तो हुंड्यात लाहोरच घेऊन जाईल या वाक्यांसह टीझर सुरु होतो. पाकिस्तानात जिथे लोक नारे देत असतात तिथे सनी पाय रोवून उभा राहतो. ‘गदर २’ चा हा टीझर पाहून अंगावर शहारे येतील हे नक्की. सनी पाजीच्या चाहत्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झालाय.

वारकऱ्यांवरील लाठीमारावरून जयंत पाटील, राऊतांचा संताप; रोहित पवारांनीही सुनावलं

गदर २ ला बॉक्स ऑफिसवर संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अॅनिमल आणि अक्षय कुमारची भूमिका असलेल्या ओएमजी २ शी सामना करावा लागणार आहे. अनेक ट्रेड विश्लेषकांनी या बॉक्स ऑफिसवरील टक्करीची निंद केली आहे. याचा फटका निर्मात्यांना बसू शकतो हे माहिती असताना रिलीज तारीख बदलली जाऊ शकत होती. मात्र निर्मात्यांनी बॉक्स ऑफिसवर स्वातंत्र्य दिनाचा आठवडा एन्कॅश करण्यासाठी त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्धार केला आहे. गदर २ चित्रपट ११ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shrigonda : उख्खलगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; एक जणांचा मृत्यू

0
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील उख्खलगाव (Ukhkhalgaon)परिसरात रविवार (दि. 8) रोजी दुपारी तीन वाजता ढगफुटी सदृश जोरदार पाऊस (Cloudburst Like Rain) झाला. जोरदार...