Friday, November 22, 2024
Homeमनोरंजनतेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितिन जयराम गडकरी...; बहुप्रतिक्षीत सिनेमा 'गडकरी'...

तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितिन जयराम गडकरी…; बहुप्रतिक्षीत सिनेमा ‘गडकरी’ चा टिझर रिलिज

मुंबई | Mumbai

भारताचे हायवेमॅन अर्थात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) हे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कारकिर्दीवर आधारित असलेल्या ‘गडकरी’ (Gadkari) सिनेमाची घोषणा झाली. काहीच दिवसांपूर्वी सिनेमाचे पोस्टर भेटीला आले होते. पोस्टर येताच सिनेमाबद्दल आणखी उत्सुकता चाळवली गेली होती. त्या पार्श्वभूमीवर आज गडकरी सिनेमाचा पहिला टीझर (Gadkari Teaser Release) प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पहिला टीझर आल्याने गडकरी सिनेमाबद्दल आणखी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

- Advertisement -

‘गडकरी’ या सिनेमाच्या टीझरमध्ये गडकरींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा आवाज ऐकू येत आहे. अभिनेता म्हणत आहे,”या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्यांनी होईल तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितिन जयराम गडकरी…”. भारताचे हायवेमॅन नितिन गडकरी यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा सिनेमा असणार आहे.

MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर ‘या’ तारखेला एकत्रितपणे होणार सुनावणी

नितीन गडकरींचा प्रवास ६० mm वर

टीझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. परंतु ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नितीन गडकरींचा हा जीवनपट प्रेक्षकांना २७ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात पाहाता येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग राजन भुसारी बोलले, ,”नितीन गडकरी हे राजकारणातील एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. पोस्टर प्रदर्शनानंतर मला अनेकांचे फोन आले. अनेकांनी मला नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार असल्याचे विचारले. मात्र ही उत्सुकता लवकरच दूर होईल. एक सर्वसामान्य कार्यकर्ता, समाजसेवक ते प्रमुख कॅबिनेट मंत्री हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रंजक आहे. त्यांचे हे दुसरं जग जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. खासगी आयुष्यात नितीन गडकरी कसे होते आणि कसे आहेत, हे ‘गडकरी’मधून प्रेक्षकांना जाणून घेता येईल”.

सिनेमात नितीन गडकरींची प्रमुख भूमिका कोण साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु आतापासूनच सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगली हवा निर्माण करण्यात आलीय.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या