Tuesday, July 16, 2024
Homeनगरगळनिंब येथे एकास कुर्‍हाड व लोखंडी पाईपने मारहाण

गळनिंब येथे एकास कुर्‍हाड व लोखंडी पाईपने मारहाण

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील गळनिंब येथे एकास कुर्‍हाड व लोखंडी पाईपने डोक्यात मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हरिश्चंद्र सुखदेव सोनवणे (वय 48) धंदा- मजुरी/शेती रा. गळनिंब ता.नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, फिर्यादीच्या वडिलांच्या जागेत त्यांची परवानगी न घेता किरण डहाळे याने हॉटेल चालू केल्याने फिर्यादिने त्यास 1 ऑगस्ट रोजी हॉटेलबाबत विचारल्याचा आरोपीस राग आल्याच्या कारणावरून सुधाकर भानुदास डहाळे याने कुर्‍हाडीने फिर्यादीच्या डोक्यात जबर मारहाण करून जखमी केले. तसेच किरण सुधाकर डहाळे व प्रविण सुधाकर डहाळे यांनी त्यांचे हातातील लोखंडी पाईपने माझे हातावर, पायावर, पाठीत खांद्यावर मारहाण करून फिर्यादीस जखमी केले तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी वरील तिघांवर गुरनं 1811/2023 भा.दं.वी. कलम 326, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक एस. एन. माने करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या