Friday, May 24, 2024
Homeनगरतलवार व कोयत्याने वार करुन युवकाची केली हत्या

तलवार व कोयत्याने वार करुन युवकाची केली हत्या

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

मागील भांडणाचा राग मनात धरून आठ ते नऊ जणांनी नेवासा (Newasa) तालुक्यातील गळनिंब (Galnimb) येथील युवकास धारदार हत्याराने वार (Youth Weapon War) करून जीवे मारल्याची घटना घडली असून नेवासा (Newasa) पोलिसांनी याबाबत 9 जणांवर गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे .

- Advertisement -

इंग्रजी माध्यमाचेच शिक्षक देणार इंग्रजीचे धडे

याबाबत प्रमोद संभाजी कापसे (वय 25) धंदा-शेती रा. सुरेगाव ता. नेवासा यांनी नेवासा पोलिसात (Newasa Police) फिर्याद दिली असून त्यात म्हटले की,माझा मित्र मयत प्रविण सुधाकर डहाळे (वय 24) शेती धंदा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याचा गेवराई येथील शेखर अशोक सतरकर व अशोक किसन सतरकर यांच्याशी मागील भांडणाच्या कारणावरून पंधरा दिवसांपूर्वी फोनवरून वाद झाला होता. तीन दिवसापूर्वी मला प्रविण भेटला व मला सांगितले की, शेखर अशोक (उर्फ खंडू) सतरकर, अशोक (उर्फ खंडू) किसन सतरकर दोघे रा. गेवराई महिंद्रा कंपनीची एक्सयूव्ही व स्कॉर्पिओ गाडी घेऊन माझ्या घरी आले. गाडीतून माझ्या वडीलांसमक्ष शेखर सतरकर, अशोक सतरकर, माऊली उर्फ अरूण दत्तात्रय गणगे, दीपक सावंत, ईश्वर पठारे, जालींदर बिरुटे व अनोळखी दोन-तीन इसम खाली उतरून प्रविण कोठे आहे? असे वडीलांना विचारून प्रविण भेटला तर त्याला गोळ्या घालून कायमचा काटा काढू असे म्हणाले असल्याचे प्रविण मला म्हणाला.

अपूर्ण कामाचे लोकार्पण म्हणजे शासनाचे अपयश

तर 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रविणच्या घरी कोणी नसल्याने मी जेवणाचा डबा घेऊन त्याच्या घरी गेलो होतो. त्यानंतर साडेसात ते आठ वाजेदरम्यान मी गळनिंब गावच्या स्टँडवर उभा असताना मला दोन चारचाकी व दोन दुचाकी वाहने प्रविणच्या घराकडे जाताना दिसली. माझ्या मोटारसायकलवरून मी व ऋषी मुरकुटे लगेच त्या गाड्यांच्या पाठीमागे गेलो असता मला प्रविण हा जीव वाचवण्यासाठी मोटारसायकल वरून नदीच्या दिशेने पळताना दिसला. नदीच्या अलिकडेच पाठिमागून आलेल्या चारचाकी वाहनाची जोराची धडक (Vehicle Hit ) बसल्याने प्रविण रस्त्याच्या बाजुला खाली पडला. गाडीच्या लाईटच्या उजेडात 220 पल्सर वरून शेखर सतरकर व माऊली गणगे हे खाली उतरले तेव्हा गाडीच्या उजेडात त्यांच्या हातात कोयता व तलवारीसारखे हत्यार दिसले. मी व ऋषी मुरकुटे गाडीचा लाईट बंद करून रस्त्याच्या कडेला लपून बघत होतो.

जिल्ह्यातील 32 गावांत राजकीय नेत्यांना बंदी

तर आम्हाला गाडीच्या उजेडात प्रविण हा खाली पडलेला दिसला व तो हात जोडताना दिसत होता. त्यावेळी शेखर अशोक सतरकर याने त्याच्या हातातील तलवारीसारख्या धारदार शस्त्राने प्रविणच्या पाठीमागून डोक्यात वार केला. तेव्हा प्रविण पूर्णपणे खाली पडताच अरूण ऊर्फ माऊली दत्तात्रय गणगे याने कोयत्याने मारहाण केली. तर अशोक किसन सतरकर, दीपक सावंत, ईश्वर पठारे, जालींदर बिरुटे हे हातातील धारदार शस्त्राने सपासप वार करत होते. तर अनोळखी दोन-तीन इसम हे हातीतील लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करत होते. त्यानंतर त्यांनी मारहाण करून जात असताना आरडाओरड करत ‘गळनिंबचा भाई तोडला…’ म्हणत निघून गेले. त्यानंतर मी व मित्र ऋषी तेथे गेलो असता प्रविण रक्तबंबाळ झालेला होता. वरील सर्वांचे नाव घेत मला मारले असे म्हणत होता. तद्नंतर त्यास आम्ही नेवासाफाटा येथील शासकीय रुग्णालयात नेत असताना तो बेशुद्ध पडला. औषध उपचारासाठी दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी शेखर अशोक ऊर्फ खंडू सतरकर, अशोक ऊर्फ खंडू सतरकर, किसन सतरकर (तिघेही रा. गेवराई), माऊली ऊर्फ अरुण दत्तात्रय गणगे (रा. सुरेगाव ता. नेवासा), दीपक सावंत (अहमदनगर), ईश्वर पठारे व जालिंदर बिरुटे (दोघे रा. वरखेड ता. नेवासा) व इतर दोन ते तीन अनोळखी अशा 8 ते 9 जणांवर गुन्हा रजिस्टर फर्स्ट 1028/2023 भारतीय दंड विधान कलम 302, 307, 143, 147, 148, 149, आर्म अ‍ॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रवीण डहाळे याच्या पश्चात आई, वडील, बहिण, भाऊ असा परिवार आहे.

5 आरोपींना अटक; चौघे सराईत गुन्हेगार

सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ ताब्यात घेणेबाबत आदेश दिले. त्यानुसार या गुन्ह्यातील अशोक ऊर्फ खंडु किसन सतरकर (वय 42), रा. गेवराई ता. नेवासा व ईश्वर नामदेव पठारे (वय 30), रा. वरखेड या दोघांना पथकाने वरखेड येथून ताब्यात घेतले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन त्यांचे इतर साथीदारांबाबत विचारपूस करता त्यांनी दोघे तिसगाव, ता. पाथर्डी येथे असल्याबाबत माहिती दिल्याने पथकाने लागलीच तिसगांव, येथे जावून आरोपी शेखर अशोक सतरकर (वय 23), रा. गेवराई अरुण ऊर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय गणगे (वय 28), रा. सुरेगाव ता. नेवासा व बंडु भिमराव साळवे (वय 32), रा. बाबुर्डीबेंद, ता. नगर यांना ताब्यात घेतले.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, राजेंद्र वाघ, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, विशाल दळवी, फुरकान शेख, कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ, रणजीत जाधव व चालक कॉन्स्टेबल अरुण मोरे यांचा समावेश होता.

आरोपी अरूण ऊर्फ ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली दत्तात्रय गणगे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गंभीर दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण 06 गुन्हे नेवासा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपी बंडु भिमराव साळवे रा. बाबुर्डीबेंद, ता. नगर हाही सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी शेखर अशोक सतरकर यांचे विरुध्द 2018 मध्ये नेवासा पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीचा -01 गुन्हा दाखल आह आरोपी अशोक ऊर्फ खंडु किसन सतरकर हा सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात 2018 मध्ये गंभीर दुखापतीचा एक गुन्हा दाखल आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या