Friday, July 24, 2026
Homeक्राईमCrime News : एलसीबीचे जुगार, बिंगो व अवैध दारू अड्ड्यांवर छापे

Crime News : एलसीबीचे जुगार, बिंगो व अवैध दारू अड्ड्यांवर छापे

नगर एमआयडीसी व श्रीरामपूर शहर हद्दीत कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कारवाई करत एमआयडीसी व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जुगार, बिंगो आणि अवैध दारू व्यवसायावर एकाच दिवशी छापे टाकले. या कारवाईत एकूण 13 संशयित आरोपींविरूध्द सात गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच लाख 68 हजार 560 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथकांनी बुधवारी (22 जुलै) विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोल्हेगाव परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पापा जलाल पठाण, गोरक्ष बन्सी शेळके आणि श्रीराम दशरथ कचरे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून 42 हजार 190 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर भिस्तबाग नाका परिसरात कारवाई करून अमोल नंदकुमार बारस्कर याच्याकडून 16 हजार 490 रूपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. याच दिवशी नवनागापूर परिसरात सुरू असलेल्या ऑनलाइन बिंगो जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत राहुल अशोक बर्डे, लकी ऊर्फ आयुष भरत आहेर, सचिन (पूर्ण नाव माहिती नाही), केतन ऊर्फ कैलास शहा (रा. नाशिक) आणि दत्तात्रय मोतीलाल देशमाने यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी येथून 4 लाख 96 हजार 860 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलापूर येथील वडारवाडा परिसरात अवैध हातभट्टी दारू विक्रीवर सलग चार कारवाया करण्यात आल्या. हिराबाई सुभाष गायकवाड, रेणुका सचिन गायकवाड, महेश बाळासाहेब गायकवाड आणि मंगल कचरू मांजरे यांच्याकडून एकूण 13 हजार 20 रूपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

Shirdi : साईबाबांची भूमिका साकारणारा अभिनेता समाधीवर बसला!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईबाबांच्या समाधीवर चित्रपटातील साईबाबांची भूमिका साकारणारा अभिनेता बसल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आल्यानंतर शिर्डी पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. कोट्यवधी साईभक्तांच्या...