Monday, November 16, 2026
Homeक्राईमShrirampur : जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा; 20 जणांवर गुन्हा दाखल

Shrirampur : जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा; 20 जणांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रक्कम, मोबाईल फोन, वाहने व जुगाराचे साहित्य असा सुमारे 4 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, निपाणी वडगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान जुगार खेळणार्‍या तसेच जुगार अड्डा चालविणार्‍या 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन, वाहने आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 4 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर धंद्यांविरोधात यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 2006 च्या दिव्यांग भरतीतील 70 शिक्षकांची मूळ फाईलच गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 2006 मधील विशेष दिव्यांग शिक्षक भरतीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या भरतीशी संबंधित 70 शिक्षकांच्या मूळ...