Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमCrime News : पहाटे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा

Crime News : पहाटे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा

21 जुगारी पकडले || पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील बागडपट्टी भागातील ढोणे गल्लीत सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी गुरूवारी (12 फेब्रुवारी) पहाटे दोनच्या सुमारास धाड टाकली. या कारवाईत तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळणार्‍या 21 जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण चार लाख 93 हजार 880 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अंमलदार विशाल कुलकर्णी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या आदेशानुसार सुपा पोलीस ठाण्याच्या प्रभारी महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत संजीव रामचंद्र राऊत, अमर रूपा छाडेकर, गणेश प्रल्हाद चोभे, राहुल प्रकाश भट, यशवंत पंढरीनाथ ढोणे, हेमंत गणेश गायकवाड, समाधान श्रीमंत सुरवसे, जिजाबा रखमाजी भोसले, अशोक विश्वनाथ चोभे, विशाल रमेश कानडे, प्रेमशंकर गणेशलाल कश्यप, मोहन दत्तु गोरे, सतीश परशराम जेजुरकर, अशोक बबन घोगरे, तुषार अशोक लड्डा, सूरज अशोक यादव, श्रीमंत निवृत्ती सुरवसे, जिशान खान मंजूरखान पठाण, अमोल महादेव कांबळे, राजू रामदास जगताप आणि रिंटू नंदेलाल महातो यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून महागडे मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुन २०२६ – मोदींची तपपूर्ती अन् ‘इंडिया’ची वज्रमूठ

0
भारतीय लोकशाही आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सलग तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करून सुमारे...