अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील एका जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा टाकून तब्बल 17 लाख 32 हजार 990 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 12 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
23 जुलै रोजी विशेष पथकाने भिंगार कॅम्प हद्दीत गस्तीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी 92 हजार 990 रूपये रोकड, 16 मोबाईल, 6 लहान-मोठी वाहने असा एकुण 17 लाख 32 हजार 990 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छाप्यादरम्यान काही जण पळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी पाठलाग करत सर्व 12 जणांना ताब्यात घेतले.
अनिकेत सुभाष कुर्हाडे (24, रा. गजराजनगर), राहुल वाळु लड्डा (35, रा. मंगलगेट), भुषण भगवान धाडगे (32, रा. भिस्तबाग चौक), मुस्सा इसा शेख (60, रा. कोठला), दिलीप शिवाजी दुसुंगे (40, रा. कापुरवाडी), जिशान राजु इनामदार (32, रा. मुकुंदनगर), आसलम मोहंम्मद शेख (55, रा. हातमपुरा), उमेश किसन कोतकर (40, रा. केडगाव), समीर सैद सय्यद (47, रा. शिरूर, पुणे), रफिक हसन शेख (32, रा. मुकुंदनगर), अल्ताप मुस्ताक शेख (34, रा. दर्गादायरा) व शब्बीर हुसेन खान (64, रा. मुकुंदनगर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.




