Sunday, June 21, 2026
Homeक्राईमSangamner : संगमनेरातील जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांचा छापा

Sangamner : संगमनेरातील जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांचा छापा

5 लाख 11 हजाराचा मुद्देमाल जप्त तर दहा जण ताब्यात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर खुर्द येथील प्रवरा नदीकिनारी पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी रविवारी (दि.22) सायंकाळी छापा टाकत दहा जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत 5 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नुकतीच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने शहरातील दोन ठिकाणी सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केली होती.

- Advertisement -

त्यानंतर तिरट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार, विशाल कर्पे, विवेक जाधव यांनी छापा टाकत अनिल एकनाथ राक्षे (वय 49, रा. संगमनेर खुर्द), शिवाजी छबु चव्हाण (वय 42, रा. अकोले नाका), श्याम दामोधर बेल्हेकर (वय 40, रा. साई मंदिराजवळ), वाहिद अजीज पठाण (वय 37, रा. सय्यद बाबा चौक), राजेंद्र तुकाराम जोर्वेकर (वय 52, रा. घुलेवाडी), सूरज प्रताप कतारी (वय 34, रा. कतार गल्ली), संपत रमेश पवार (वय 45, रा. संजय गांधी नगर), तुळशीदाम दादा वाळुंज (वय 65, रा. कोल्हेवाडी), अक्षय पंढरीनाथ वाघमारे (वय 25, रा. संगमनेर) व अक्षय उर्फ मोबी कतारी (रा. कतार गल्ली) अशा दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 28 हजार 200 रुपये रोख रक्कम, 1 लाख 18 हजार रुपयांचे 9 मोबाइल, 3 लाख 65 हजार रुपयांच्या 6 दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 5 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अभंग हे करत आहे.

ताज्या बातम्या

​Crime News : मंत्री महाजन यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा; नाशिक सायबर...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik राज्याचे कुंभमेळा मंत्री व भाजप आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्हलआणि बदनामीकारक पोस्ट तसेच व्हिडिओ...