Thursday, May 21, 2026
Homeक्राईमShevgaon : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

Shevgaon : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

9 जण ताब्यात || 3.15 लाखांचा मुद्देमाल जप्त

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgaon

शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील जुने दहिफळ येथे अवैधरित्या सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर शेवगाव पोलिसांनी छापा टाकून 9 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोटारसायकली, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, जुने दहिफळ गावातील लोखंडे किराणा दुकानाशेजारी पिवळी ताडपत्री लावून काही इसम तिरट नावाचा हार-जीतचा जुगार खेळत आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुटकुळे यांनी तत्काळ तपास पथक तयार करून दोन पंचांसह घटनास्थळी छापा टाकला.

- Advertisement -

यावेळी काही जण गोलाकार बसून पैशांवर तिरट जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून शफीक युसूफ शेख, उत्तम दगडू दिवटे, बाबासाहेब पाराजी मगर, रामदास आबासाहेब शिंदे, रामचंद्र मनोहर कुळभाऊ, शेषराव नानासाहेब गायकवाड, युनूस रुस्तुम शेख, बाळू उत्तम परदेशी व सुन्नीभाऊ सुलेमान शेख या नऊ जणांना ताब्यात घेतले.

कारवाई दरम्यान जुगाराचे साहित्य, पैशांच्या देवाण-घेवाणीसाठी वापरलेले मोबाईल तसेच तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यात बजाज पल्सर, टीव्हीएस स्टार व हिरो स्प्लेंडर या मोटारसायकलींसह विविध कंपनीचे सहा मोबाईल व 5 हजार 500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 3 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शाम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 423/2026 दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, बाजीराव सानप, नितीन भताने, निलेश म्हस्के, शाम गुंजाळ, भगवान सानप, राहुल आठरे, ईश्वर बेरड, राजु बडे, वसंत वैद्य, एकनाथ बुधवंत, सुरज भावले, संपत खेडकर, प्रशांत आंधळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास नितीन भताने करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा पोलीस दलातील पाच अधिकार्‍यांना पदोन्नती

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्य पोलीस दलातील पदोन्नतीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून राज्यभरातील 77 सहायक पोलीस निरीक्षकांना (एपीआय) पोलीस निरीक्षक (पीआय) पदावर, तर 488 पोलीस...