कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत (Karjat) तालुक्यातील परिटवाडी (Paritwadi) येथे जुगार अड्ड्यांवर छापा (Gambling Den Raid) टाकत कर्जत पोलीसांनी कारवाई (Karjat Police Action) केली. यामध्ये 8 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करून 8 जणांंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्जत येथील परीक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, तालुक्यातील परीट वाडी (Parit wadi) येथे एका शेतामध्ये तिरट नावाचा हार जितचा पत्त्यांचा खेळ सुरू आहे.
अंबडच्या लाठीमाराचा जिल्ह्यात निषेध
या अवैध जुगार अड्ड्यावर (Illegal Gambling Dens) पोलीस पथकाने छापा टाकून जुगार खेळण्याची साहित्य, दुचाकी, चारचाकी वाहने, मोबाईल असा 8 लाख 93 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. तसेच अनिल बबन माने, जीवन संभाजी साळवे, दत्तात्रय दादाराव राऊत, पोपट अशोक चिंचकर, अजय महादेव घोणे, कृणाल राधेश्याम वर्मा, बाळू तुकाराम दामोदरे, विशाल तुकाराम माळवदे यांच्यावर गुन्हे दाखल (Filed a Case) करण्यात आले आहेत. ही कारवाई परीक्षा विधीन पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतच्या पोलीस पथकाने केली.
मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज हा सरकारचा…; आ. थोरातांची संतप्त प्रतिक्रिया 28 लाखांच्या 13 सोलर पंपाची परस्पर विल्हेवाट