Saturday, July 27, 2024
Homeजळगावमोरगांव येथे जुगार अड्ड्यावर धाड

मोरगांव येथे जुगार अड्ड्यावर धाड

जळगांव jalgaon |प्रतिनिधी-

मोरगांव (Morgaon) (ता.रावेर) येथे सोमवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेने जुगार (Gambling) अड्ड्यावर धाड (raids) टाकून मोठी कारवाई केली.यात खडसे समर्थक अडकल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे.या अड्ड्यावर पोलिसांना १ लाख ४६ हजार ९४० रुपये रोकड हस्तगत करून १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींना अटक करून जामिनावर सोडून देण्यात आले आहे.    

- Advertisement -

मी राऊतांना घाम फोडणारा, माझ्या नादी लागू नकाबारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..

येथे नवीन प्लॉट एरीयात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखा व रावेर पोलीस यांनी संयुक्तिक हि कारवाई केली.यात ५४ लाख  रुपयांची वाहने व १ लाख ४६ हजार ९४० एवढी रोकड जप्त केली आहे.

रावेर पोलिसांत या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात संदीप देशमुख (पूर्णाड),संजय गुप्ता (लालबाग),शांताराम मंगळकर (लालबाग),समाधान कोळी (सांगावा),कासम तडवी (पिंप्री),जितेंद्र पाटील (विटवा),कैलास भोई (रावेर),मनोज पाटील (पिंप्रीनांदू),मनोज सोळुंके(बऱ्हाणपूर),सुधीर तुलसानी (बऱ्हाणपूर),रवींद्र महाजन (वाघोदा),बापू ठेलारी (पुर्णाड),राजू काळे (बऱ्हाणपूर),युवराज ठाकरे (रावेर),सोपान महाजन (आडगांव),छोट्या पूर्ण नांव माहित नाही,पुंडलिक पाटील (मोरगांव) यांची आरोपी म्हणून नांवे आहेत.

शासनाच्या धोरणाअभावी गाळेधारकांचा 11 वर्षांपासून विषय प्रलंबितजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे होणार विभाजन

जुगार अड्यावर झालेल्या कारवाईनंतर रावेरात खळबळ उडाली आहे.यात आ.खडसे समर्थक असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून,विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.खडसे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावरून सरकारवर निशाना साधला होता.यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले होते. 

- Advertisment -

ताज्या बातम्या