Saturday, March 29, 2025
Homeनंदुरबारगणेशला मिळाली पाच लाखांची मदत

गणेशला मिळाली पाच लाखांची मदत

तळोदा । ता. प्र. nandurbar

असलोद ता.शहादा येथील दिव्यांग गणेश अनिल माळी याला शिंदे फाऊंडेशनतर्फे 5 लाखांची मदत मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर मदत गणेशच्या पालकांकडे सुपूर्द केली आहे.

- Advertisement -

असलोद (ता.शहादा) येथील इयत्ता 3 रीत शिकणार्‍या व दोन्ही हातांनी दिव्यांग असलेल्या गणेश अनिल माळी याला कृत्रिम हात मिळावे, त्याच्या शिकण्याच्या जिद्दीला बळ मिळावे यासाठी प्रयत्न केले जात होते. शहाद्याचे आ.राजेश पाडवी, शिरपूरचे आ.अमरीशभाई पटेल यांनी प्रयत्न केले. कृत्रिम हात बसविण्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शन घेतले. पण, उपयोग झाला नाही. अखेरचा प्रयत्न म्हणून डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, नाशिकचे प्रथमेश पाटील यांच्या सहकार्यातून काल राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गणेशला पोहचवण्यात यश आले.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या फाऊंडेशनच्या वतीने 5 लाखाचा मदत गणेश व त्याच्या पालकांना सुपूर्द केली. गणेशच्या मदतीसाठी वेळोवेळी मुंबई घेऊन जाणे, त्याच्या परीस्थीतीची मांडणी करणे, पालकांबरोबर थांबणे यासाठी सामाजिक कार्यकर्ता किशोर कदम यांचे सहकार्य लाभले, मुख्यमंत्र्यांसह विविध ठिकाणांहून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मंदाण्याचे सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे यांनी परीश्रम घेतले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भरीव मदतीबद्दल गणेश वडील अनिल माळी, अनिल भामरे, किशोर कदम यांनी त्यांचे आभार मानले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...