Sunday, May 26, 2024
Homeनगरकार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्सव

कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्सव

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश मंडळांकडून (Ganesh Mandal) तयारीला वेग आला असून, मंडप (Mandap) उभारणीची कामे सुरू झाली आहेत. महापालिकेकडे (Ahmednagar Municipal Corporation) शुक्रवारपर्यंत 70 गणेश मंडळांनी परवानगीसाठी (Permission) अर्ज केले आहेत. त्यांना परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा (Public Ganeshotsav Celebration) करणार्‍या गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी दिली जाते. त्यासाठी महापालिकेत एक खिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. अग्निशमन विभाग (Fire Department), नगर रचना विभाग (Town Planning Department) एकाच ठिकाणी परवानगी देत आहेत. परवानगीसाठी शहरातील मंडळांकडून 70 अर्ज महापालिकेकडे दाखल करण्यात आले होते. या सर्वांची छाननी होऊन त्यांना परवानगी मंजूर करण्यात आली आहे.

दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार तहसीलदारांच्या नियंत्रणाखालील प्रशासकीय समितीमार्फत शहरातील गणेश मंडळांनी उभारलेल्या मंडपांची तपासणी करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप ही समितीच स्थापन झाली नसल्याचे समोर येत आहे. महापालिका प्रशासनाकडेही समिती स्थापन झाल्यासंदर्भात कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत, असे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या