Monday, May 20, 2024
Homeनंदुरबारशांतता कमिटीच्या बैठकीत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

शांतता कमिटीच्या बैठकीत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

मोदलपाडा Modalpada/ सोमावल वार्ताहर ता.तळोदा

गणेश उत्सवाच्या (Ganesh festival) पार्श्वभूमीवर तळोदा येथील पोलीस (police) स्टेशन मार्फत आयोजित शांतता कमितीच्या बैठकीत (peace committee meeting) गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी (Ganesh Mandal office bearers) समस्यांचा पाढा वाचला (read out the problems). पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी तक्रारींवर योग्य समाधान काढल्याने मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisement -

तळोदा येथील पोलीस स्टेशन मार्फत शांतता कमिटीचे आयोजन सकाळी ११ वाजता प्रशासकीय इमारतीमध्ये करण्यात आले होते. या बैठकीच्या व्यासपीठावर नगराध्यक्ष अजय परदेशी, तहसीलदार गिरीश वाखारे, पालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावा, महावितरण चे विभागीय उप कार्यकारी अभियंता तिरुपती पाटील, विश्वनाथ कलाल, हाजी निसार मकराणी उपस्थित होते. त्याशिवाय बैठकीला योगेश मराठे, जयसिंग माळी दीपक चौधरी, विजय सोनवणे, योगेश गुरव, दद्दु दुबे, शहीद पठाण, राजेंद्र माळी, रसिकलाल वाणी, राजाराम राणे, अतुल सूर्यवंशी, संजय वाणी, आदीसह गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, विश्वनाथ कलाल, केसरसिंग क्षत्रिय, रसिकलाल वाणी, हाजी निसार मकराणी, धीरज कलाल व फुंदीलाल माळी, विजय सोनवणे, संजय शेंडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी तहसीलदार गिरीश वाखारे म्हणाले की कोरोनामुळे मागील दोन वर्षे गणेश उत्सव हा साजरा करता आला नाही परंतु यावर्षी परिस्थिती आटोक्यात असल्याने गणेश उत्सव उत्साहात साजरा होत आहे. परंतु असे असले तरी उत्साहाबरोबरच प्रत्येक गणेश भक्तांची सामाजिक जबाबदारी आहे की, गणेश उत्सव शांततेत कसे पार पडेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

नगराध्यक्ष अजय परदेशी म्हणाले की, नगरपालिकेकडून स्ट्रीट लाईट, रस्ते दुरुस्ती, याचे काम हाती घेण्यात आले आहे तसेच तापी नदीवर मोठ्या मूर्तींच्या वीसर्जनसाठी क्रेन सुद्धा पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच लहान मूर्तींच्या विसर्जनासाठी मार्केट कमिटीच्या आवारात पालिकेकडून हौद बनविण्यात येणार असुन लहान गणेश मूर्तींचे विसर्जन त्या हौदेत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी पो नि पंडित सोनवणे यांनी सांगितले की, पोलिसांमार्फत या गणेश उत्सवात प्रत्येक मंडळाला भेटी देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहे. तळोदा शहरात मोहल्ला बैठकी घेऊन स्वयंसेवक नेमले जातील यावर्षी नंदुरबार जिल्हा हा डिजेमुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत कोणत्याही मंडळाने डी जे वाजवू नये. कर्कश व मोठया आवाजात डी जे वाजवतांना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई चे संकेत त्यांनी यावेळी दिले.

गणेश उत्सवात शांतता कमिटीचे सदस्य गायब

कोणत्याही धार्मिक उत्सवात शांतता कमिटीचे सदस्य जातीने हजर राहणे अपेक्षित असतांना मात्र गणेश उत्सवात शांतता कमिटीचे सदस्यच हजर राहत नाही असा तक्रारीचा सूर उपस्थित गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उमटला आहे. त्यामुळे नुसतीच औपचारिकता पार न पाडता या सदस्यांनी संपूर्ण गणेश उत्सवात आपली जबाबदारी पार पाडवी अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पोलीस राबविणार एक खिडकी योजना

गणेश मंडळांच्या गणेश उत्सव साजरा करण्यासाठी व विसर्जनाच्या परवानगीचे सर्व सोपसकर पार पाडण्यासाठी पोलिसांकडून एक खिडकी योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेच्या अमलबजावणीसाठी दोन पोलीस कर्मचारी गणेश उत्सवाच्या कालावधीत गणेश भक्तांना सहकार्य व मदत करणार आहेत. या अंतर्गत परवानगी चे अर्ज भरून घेणे, परवानगी चे अर्ज जमा करणे व अन्य अडचणी बाबत एक खिडकी योजने मार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या