मुंबई | Mumbai
वरिष्ठांनी परवानगी दिली तर शिंदेंच अस्तित्व संपवून टाकू असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं होतं. माझं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष एकटा लढला असता तर कल्याण आणि उल्हासनगर महापौर झाला असता. किल्ले कोणाचे नाहीत, भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना यांचं नामोनिशान साफ करून टाकू. हे आज मी परत बोलतोय, पण भारतीय जनता पक्ष शिस्तीचा आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. मनाला पटत नसताना हे कार्यकर्त्यांनी सहन केलं आहे असे म्हणताना गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे.
त्याला आता एकनाथ शिंदे यांच्या जवळचे व्यक्ती म्हणून ओळखणारे प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कुणी कितीही वल्गना केल्या तरी एकनाथ शिंदे समर्थ आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी तो भक्कम केला. बोलणं सोपं असतं, मात्र शिंदेंनी विधानसभा निवडणूक, नगरपरिषद निवडणुकीमध्ये करून दाखवले आहे. शिवसेना राज्यात नंबर दोनचा पक्ष आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. गणेश नाईकांच्या टीकेवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले आहे.
मागच्यावर्षी राज्य सरकार अस्तित्वात आल्यापासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात मतभेद, कुरबुरी सुरूच आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने हे मतभेद आणखी वाढले आहे.




