Friday, June 19, 2026
Homeमहाराष्ट्रRashmi Shukla: पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून विसर्जन सोहळा बंदोबस्ताचा आढावा

Rashmi Shukla: पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून विसर्जन सोहळा बंदोबस्ताचा आढावा

पुणे(प्रतिनिधी)

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून विसर्जन सोहळा बंदोबस्ताचा आढावा शुक्रवारी घेण्यात आला. पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्ला यांनी बंदोबस्ताबाबत सूचना दिल्या.

- Advertisement -

वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन सोहळ्यासाठी पुणे शहरात आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. प्रथेप्रमाणे विसर्जन मिरवणूक सोहळ्याचा प्रारंभ शनिवारी (६ सप्टेंबर) मंडईतील टिळक पुतळा परिसरातून होणार आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ एक तास अगोदर म्हणजेच सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी मानाच्या मंडळांसाठी वेळापत्रक तयार केले आहे. वेळापत्रकानुसार मंडळांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढून वेळेत विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मानाचा पहिल्या गणपती कसबा गणपती मंडळाचे महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्याजवळ शनिवारी (दि. ६) सकाळी सव्वा नऊवाजता आगमन होईल. तेथे पूजा झाल्यावर साडेनऊ वाजता मिरवणुकीस प्रारंभ होईल सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हे मंडळ लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात येईल. तेथून सव्वा दहा वाजता हे मंडळ मार्गस्थ होईल. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ सकाळी साडेदहा वाजता लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होईल.

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालिम मित्रमंडळ बेलबाग चौकातून सकाळी अकराच्या सुमारास लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होईल. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मित्र मंडळ गणपती व मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती दुपारी बाराच्या सुमारास बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने मिरवणुकीत सहभागी होतील. त्यानंतर पुणे पालिका गणपती मंडळ व त्वष्टा कासार गणपती मंडळ दुपारी एकच्या सुमारास मुख्य मिरवणुकीत सामील होतील. मानाच्या पहिल्या कसबा गणपती मंडळाच्या श्रींचे दुपारी पावणे तीन वाजता विसर्जन होईल. मानाच्या सर्व मंडळांचे दुपारी साडेचारपर्यंत टिळक चौकातील नदीपात्रात विसर्जन होईल. त्यानंतर सिटी पोस्ट कार्यालयाकडून लक्ष्मी रस्त्याने व दत्तमंदिराकडून शिवाजी रस्त्याने येणारी मंडळे बेलबाग चौकातून रांगेमध्ये लागलेल्या क्रमानुसार मुख्य मिरवणुकीत सामील होण्याकरीता सोडण्यात येतील.

ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

विसर्जन मार्गावर ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. मिरवणूक सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षण मनोरे प्रमुख चौकात उभे केले जाणार आहेत. गर्दीतील चोरी, छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसंचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान, राज्या राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यासह विविध विसर्जन मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

मिरवणुकीसाठी ७ हजार पोलिसांचा फौजफाटा

वैभवशाली परंपरा असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, मिरवणूक निविर्घ्नपणे पार पाडण्यासाठी तब्बल ७ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियोजन, सर्व्हेलन्स कॅमेरे, मोबाइल सर्व्हेलन्स वाहने कार्यरत राहणार आहेत. बीडीडीएस पथक, क्यूआरटी टीम, गुन्हे शाखेतील साध्या वेशातील कर्मचारी अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार जातीने लक्ष ठेवणार असून सह पोलीस आयुक्तांसह चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त , २७ सहायक पोलीस आयुक्त, १५४ पोलीस निरीक्षक , ६१८ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक , ६,२८६ पोलीस अमंलदार, ११०० होमगार्ड, राज्य राखीव दलाचे ९० जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. त्याशिवाय बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघर कृती दलाचीही पथके बंदोबस्तासाठी नेमण्यात आली आहेत. गुन्हे प्रतिबंधासाठी साखळी चोरी प्रतिबंधक पथक, मोबाइल चोरीविरोधी पथक, महिला व बाल सुरक्षा पथक कार्यरत राहणार आहेत. त्याचबरोबर सीसी टीव्हीबरोबरच , लोखंडी मनोऱ्यावरून गर्दीवर नियंत्रण केले जाणार आहे.

ताज्या बातम्या

Crime News : नारळ फोडण्याचा दगड घातला डोक्यात

0
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed मोटारसायकल इथे का लावली, तुम्ही मंदिरात जायचे नाही, असे म्हणत मारहाण करत मंदिरासमोर नारळ फोडण्याचा दगड डोक्यात घातल्याने मुकुंद पोकळे हा तरुण...