Tuesday, March 25, 2025
Homeनगरगणेश विसर्जन मिरवणुकीला नगरमध्ये सुरूवात 

गणेश विसर्जन मिरवणुकीला नगरमध्ये सुरूवात 

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात (Shri Vishal Ganesh Mandir) जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ (Collector Siddharam Salimath) यांच्या हस्ते उत्थापन पुजा संपन्न होऊन मुख्य मिरवणुकीस (Procession) प्रारंभ झाला आहे. फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्रीगणेश मुर्ती ठेवण्यात आली आहे. तसेच सनई चौघडा, रूद्रनाद, युगंधर ढोल पथकाचे वादन तसेच ब्रम्हाश्त्र संस्थेच्या वतीने पारंपारीक खेळ सादर केले जात आहे.

- Advertisement -

यामध्ये शिवकालीन खेळांचे प्रात्याक्षिक दाखविण्यात येत आहे. दरम्यान, सायंकाळी 11 मानाची गणेश मंडळे, शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाची दोन व इतर अशी एकूण 17 गणेश मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. नगर शहर पोलिसांनी (Police) मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...