Saturday, October 24, 2026
Homeनगरगणेश विसर्जन मिरवणुकीला नगरमध्ये सुरूवात 

गणेश विसर्जन मिरवणुकीला नगरमध्ये सुरूवात 

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात (Shri Vishal Ganesh Mandir) जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ (Collector Siddharam Salimath) यांच्या हस्ते उत्थापन पुजा संपन्न होऊन मुख्य मिरवणुकीस (Procession) प्रारंभ झाला आहे. फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्रीगणेश मुर्ती ठेवण्यात आली आहे. तसेच सनई चौघडा, रूद्रनाद, युगंधर ढोल पथकाचे वादन तसेच ब्रम्हाश्त्र संस्थेच्या वतीने पारंपारीक खेळ सादर केले जात आहे.

- Advertisement -

यामध्ये शिवकालीन खेळांचे प्रात्याक्षिक दाखविण्यात येत आहे. दरम्यान, सायंकाळी 11 मानाची गणेश मंडळे, शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाची दोन व इतर अशी एकूण 17 गणेश मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. नगर शहर पोलिसांनी (Police) मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

ताज्या बातम्या

ओझर

Nashik Airport New TimeTable: नाशिकच्या ओझर विमानतळावुन विमानसेवेचे २५ ऑक्टोबरपासून नवे...

0
नाशिक | प्रतिनिधीनाशिकच्या ओझर विमानतळावरून विमानसेवेचे २५ ऑक्टोबरपासून नवे प्रस्तावित वेळापत्रक लागू होणार आहे. हे वेळापत्रक २७ मार्च २०२७ पर्यंत वैध राहणार आहे. प्रस्तावित वेळापत्रकानुसार,...