Friday, September 20, 2024
Homeनगरगणपती विसर्जनामुळे ईदच्या मिरवणुकीची तारीख बदलली

गणपती विसर्जनामुळे ईदच्या मिरवणुकीची तारीख बदलली

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून या दिवशी 10 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. याच दिवशी मुस्लिम बांधव ईदची मिरवणूक काढतात. विसर्जनाला निघालेले गणेश भक्त आणि ईद मिरवणुकीला निघालेले मुस्लिम बांधव यांच्यात तणाव निर्माण होऊ नये, विसर्जन आणि जुलूस शांततेत पार पडावा यासाठी संगमनेरातील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादची मिरवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून ही मिरवणूक दिनांक 16 ऐवजी 18 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

ईद-ए-मिलाद मिरवणूक 16 तारखेला काढण्यात येणार होती. याच कालावधीमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक निघणार असल्याने ईद-ए-मिलाद मिरवणूक दोन-तीन दिवस पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आली होती. ्काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी यास सुरुवातीस विरोध दर्शवला. प्रत्येकवेळी मुस्लिम समाजानेच का माघार घ्यायची. तुम्ही गणेश मंडळांना माघार घेण्यास सांगू शकत नाही का? अशी भावना पोलीस ठाण्यात पार पडलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती.

यानंतर शहरातील मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यात ईद-ए-मिलादची मिरवणूक 18 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मुस्लिम धर्मगुरूंनी याबाबत समाजाला कळविले आहे. आपल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे. मुस्लिम बांधवांचा हा निर्णय कौतुकास्पद असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या