Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedVideo : अनोख्या गणपती आरासची पंचक्रोशीत चर्चा!

Video : अनोख्या गणपती आरासची पंचक्रोशीत चर्चा!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जेलरोड (Jailroad) येथील त्रिवेणी पार्क (Triveni Park) येथे राहणाऱ्या संस्कृती (Sanskruti Bodke) आणि काव्या किरण बोडके (Kavya Bodke) यांनी स्वतः बनविलेली बाप्पाची मंगलमूर्ती आपल्या घरात विराजमान केलेली आहे…

- Advertisement -

आपल्या लाडक्या बाप्पासोबत आरास करताना त्यांनी एका बाजुला “आपलं गाव” तर दुसऱ्या बाजूला सीमेचे रक्षण करणारे सैनिक दाखवले आहे.

मूळचे सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) वडझिरे गावातील बोडके कुटुंब हे देशसेवेसाठी असलेले कुटुंब म्हणून ओळखले जाते. आरास बनविलेल्या संस्कृती आणि काव्या यांचे वडील मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे. त्यांचे काका म्हणजे शहिद श्रीकांत श्रीकृष्ण बोडके (Srikant Bodke) होत. २००२ साली जम्मूमध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली.

बोडके भगिनींनी सीमा रक्षण आणि शेती ही आरास साकारताना आपल्या काकांचे बलिदान आणि वडिलांची कर्तव्यनिष्ठा यांची जाणीव ठेवल्याचे दिसून येते.

ही आरास साकारताना आजोबा श्रीकृष्ण बोडके, आजी किसनाबाई बोडके आणि आई प्रीती किरण बोडके यांची मदत त्यांना मिळाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या