Saturday, November 23, 2024
Homeनाशिकलाडक्या बाप्पाच्या आगमासाठी बाजारपेठ सजली; सजावटींच्या वस्तू, पूजा साहित्य घेण्यासाठी भक्तांची गर्दी

लाडक्या बाप्पाच्या आगमासाठी बाजारपेठ सजली; सजावटींच्या वस्तू, पूजा साहित्य घेण्यासाठी भक्तांची गर्दी

नाशिक | Nashik
राज्यात गणेशोत्सवाची धामधुम सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच उद्या सर्वत्र श्री गणेशाची स्थापना होणार असून आजपासूनच अनेक ठिकाणी गणेश मूर्तींचे आगमन होत आहे. तसेच गणरायाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी लगबग सुरू आहे. गणरायाच्या पूजेसाठी लागणारे धुप, कापुर, अगरबत्ती, गळ्यातील कंठीहार,सजावटीसाठी लागणारे कृत्रिम फुलांच्या माळा तसेच विविध साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे.

शहरातील मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, सराफ बाजार यांसह उपनगरात सर्वत्र सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. संपूर्ण परिसर आकर्षक चमकी व मखरींनी व्यापलेला आहे. बाजारात विविध प्रकारांमध्ये मखरी उपलब्ध असून, गणेशोत्सव काळात मखरींना मागणी वाढली आहे. तसेच कृत्रीम फुले, चमकीचे पडदे, लाईटींगच्या माळा इत्यादी साहित्य खरेदीसाठी बाजारात उपलब्ध आहे.

- Advertisement -

थर्माकोल मखरांना बंदी असल्याने पर्यावरणस्नेही अशा कापडी, कागदी मखरी बाजारात दाखल झाल्या आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून घरगुती गणेशोत्सवासाठी मखरींना मागणी वाढली आहे. या पर्यावरणस्नेही मखर फोल्डेबल असल्याने त्यांचा दीर्घकाळ वापर करता येणार आहे. याशिवाय मोत्यांचे, कापडी तोरण, वॉल हॅगिंग, कृत्रिम फुले यांचीही ग्राहक आवडीने खरेदी करीत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या