Tuesday, July 28, 2026
Homeक्राईमगणेशवाडी शिवारात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

गणेशवाडी शिवारात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

18 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त || पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

गणेशवाडी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 18 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तीन वाहने जप्त करण्यात आली असून, पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 26 मे रोजी सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनई-गणेशवाडी शिवारात चारचाकी वाहनांतून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

- Advertisement -

या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने गणेशवाडी परिसरात सापळा रचून कारवाई केली. यावेळी एमएच 20 ईएल 7990, एमएच 16 एई 3235 तसेच एक विनाक्रमांक वाहन अशा तीन वाहनांतून बेकायदेशीररित्या वाहतूक होत असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी वाळूसह वाहने असा एकूण 18 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादीवरून किरण बाबासाहेब सिसोदे (वय 25, रा. खलाल पिंपरी), विवेक दत्तात्रय शिंदे (वय 19, रा. निपाणी निमगाव), आकाश तांबे (रा. पानेगाव), बाळासाहेब पुंडलिक नळगे (वय 42, रा. बहिरवाडी) आणि राजू सुपनर (रा. अंमळनेर) यांच्याविरोधात सोनई पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 303(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र पवार करत आहेत.

ताज्या बातम्या

default-featured-image

Shalarth ID Scam : १६० कोटींची ‘मास्तर’की! शालार्थ आयडी घोटाळ्यातील २९...

0
नाशिक | Nashik राज्य शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या बहुचर्चित ‘शालार्थ’ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याला अटकपूर्व...