Tuesday, January 27, 2026
Homeक्राईमCrime News : उसन्या पैशाच्या वादातून एकावर टोळक्याचा हल्ला

Crime News : उसन्या पैशाच्या वादातून एकावर टोळक्याचा हल्ला

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पुण्यात नेट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणावर, सुट्टीसाठी पाथर्डीत (Pathardi) आल्यानंतर, उसन्या पैशाच्या वादातून (Money Dispute) मुंढे जॉगिंग पार्क येथे 10 ते 15 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला (Attack) केला. या घटनेत तरुण आणि त्याच्या मित्राला गंभीर दुखापत झाली असून, पाथर्डी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

- Advertisement -

मयुर ढोले (वय 20, रा. दुलेचांदगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 24 मे ला सायंकाळी 7:30 वाजता ते आणि त्यांचा मित्र ऋषी फुंदे जॉगिंग पार्कमध्ये फिरत होते. ऋषीने त्याचा मित्र प्रतीक जायभायेकडे जानेवारी 2025 मध्ये दिलेले 22,000 रुपये परत मागितले. यानंतर प्रतीक आणि त्याच्या साथीदारांनी लाकडी दांडके व लोखंडी रॉडने हल्ला (Attack) केला. मयुरने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, शुभम दराडेने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून गंभीर जखम (Injured) केली.

YouTube video player

हल्लेखोरांनी शिवीगाळ करत पुन्हा पैसे मागितल्यास जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली. जखमी मयुर आणि ऋषी यांच्यावर अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी प्रतीक जायभाये (रा. आनंदनगर), राहुल शिरसाट (रा. शिरसाटवाडी), शुभम दराडे (रा. पागोरी पिंपळगाव), आदित्य आव्हाड (रा. हंडाळवाडी), जगदिश महाजन (रा. शिरसाटवाडी) आणि इतर दोन ते तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे हे तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...