वावी | प्रतिनिधी
येथील वावी पोलिस ठाण्याच्या (Vavi Police Station) हद्दीत शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या (Electric Pump) चोरीची दहशत माजवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला (Local Crime Branch) यश आले आहे…
Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांची ‘दादागिरी’; कॉलर पकडून कावडधारक शिवभक्तांना धक्काबुक्की
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांचे (Farmers) विद्युत पंप चोरी जाण्याचे प्रकार घडत होते. मात्र, याचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यानंतर वावी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी या गोष्टीचा सुगावा घेत वावी परिसरातील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्याने हे दोन्ही संशयित आरोपी वावी गावात पुन्हा मोकाट फिरत होते. तसेच विद्युत पंप चोरी जाण्याचे प्रकार देखील थांबत नव्हते.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार – भुजबळ
त्यानंतर परिसरातील नागरिकांकडून (Citizens) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना तक्रारी जात असल्याने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांच्या आदेशाने आणि पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संशयित आरोपींचा मागील काही दिवसांपासून तपास सुरू होता. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला विद्युत पंप चोरणाऱ्या दत्तात्रय रघुनाथ सापते, श्रीपत दिनकर पवार, निवृत्ती सोपान माळी, राधेश्याम चौहान या चार संशयित आरोपींना पकडण्यात यश आले असून त्यातील मुख्य सुत्रधार दत्तू सापते यास पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत त्याची अधिक चौकशी केली असता आतापर्यंत जवळपास ३० ते ३५ विद्युत पंप चोरल्याची कबुली दिली आहे. तसेच सदर चोरीचे पंप विकत घेणाऱ्यास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Video : पिंपळगाव बसवंतला एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास
दरम्यान, सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस हवालदार दीपक अहिरे, शांताराम नाठे, विनोद टिळे, गिरीश बागुल, अनुपम जाधव, सतीश जगताप यांनी केली असून वावीसह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच याप्रकरणी संशयित आरोपींवर ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Custody) मिळाली आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Video : सिडको परिसरात टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड