Saturday, July 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजचालत्या वाहनांतून लूटमार करणारी टोळी जेरबंद

चालत्या वाहनांतून लूटमार करणारी टोळी जेरबंद

दिंडोरी पोलिसांची कारवाई ; आठ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

दिवसभर शेतात मजुरीकाम करायची आणि रात्री नाशिक-पेठ महामार्गावरील सावळघाटात लुटमार करायची. असा गुन्हेगारी मार्ग अवलंबणार्‍या सराईत टोळीला दिंडोरी पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे चालत्या गाडीतून लूट करण्यात ही टोळी पटाईत होती. या टोळीकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

- Advertisement -

दि. 5 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पेठ हून नाशिककडे माल घेऊन आयशर गाडी (क्रमांक एमएच 21 बीएच 9922) सावळघाटातून जात असताना संशयित आरोपींनी चालत्या गाडीची मागील ताडपत्री कापून गाडीतील मोती साबणाचे पाच बॉक्स लंपास केले होते. याप्रकरणी दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सावळघाटात यापूर्वी देखील मागील दीड ते दोन वर्षांपासून चालत्या वाहनांतून माल चोरीला गेल्याच्या घटना वारंवार घडलेल्या होत्या. या घटनांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. दिंडोरी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करत सदर ठिकाणी वेळोवेळी पाळत ठेवली. त्यानुसार पथकाने सुरगाणा, दिंडोरी व निफाड तालुक्यात जाऊन आठ संशयित आरोपींना जेरबंद केले.

दिंडोरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर, उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, मनोज खुळे, अल्ताफ शेख, उपनिरीक्षक संजय गायकवाड, नागेश गायकवाड, हवालदार गुलाब पवार, विश्वनाथ काकड, पराग गोतुरणे, कमलेश देशमुख, प्रदीप शिंदे, अंमलदार दिलीप राऊत, प्रविण भोईर, झांबरू सूर्यवंशी, दशरथ साबळे, विशाल पैठणकरल प्रकाश गायकवाड, अविनाश आहेर, ललीत जाधव, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

Onion Rate : घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

0
नेवासा | Newasa येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) शनिवारी कांद्याची 55 हजार 373 गोण्या आवक झाली. भाव 2700 रुपयांपर्यंत...