लखमापूर | वार्ताहर
विवाह सोहळा आटोपल्यानंतर चार दिवसांनी नवऱ्यासह सासरच्या कुटुंबीयांना जेवणात गुंगीचे औषध खाऊ घालत सर्व कुटुंबीय गाढनिद्रेच्या अधीन गेल्याचे लक्षात येतात घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे तीन ते चार लाखाचा ऐवज घेऊन रात्रीतून पसार झालेल्या नववधू सह लग्न जमविणारा एजंट व बनावट मावशी अशा तिघांना सटाणा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे, लग्न करून गंडा घालणारी टोळीच हाती लागल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.
पोलिस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत, हवा,.सुनील देवरे निंबा खैरनार, सुनिता कावळे, शिंदे,समाधान कदम.यांचे पथक तयार करून त्यांनी आरोपींना अटक केली.
तिघांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.