Tuesday, September 8, 2026
Homeनगरसराफ दुकानांमध्ये दागिने चोरणारी टोळी पोलिसांनी केली जेरबंद

सराफ दुकानांमध्ये दागिने चोरणारी टोळी पोलिसांनी केली जेरबंद

कर्जत । प्रतिनिधी

कर्जत शहरातील प्रसिद्ध सुरेश काका सराफ अँड सन्स या सराफ दुकानात भरदिवसा सुमारे 1 लाख 69 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीचा कर्जत पोलिसांनी छडा लावला आहे.

- Advertisement -

दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या संशयित महिलांचा माग काढत पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतल्याने या धाडसी चोरीचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. ज्या महिला चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये द्वारका मच्छिंद्र केंगार वय 52 वर्ष, शिलाबाई लक्ष्मण केंगार व 48 वर्ष, लीलावती लक्ष्मण केंगार वय पन्नास वर्ष, कलावती मोतीराम केंगार वय 58 वर्ष सर्व राहणार मुर्शिदपूर बीड यांचा समावेश आहे.

या प्रकरणी ओम सचिन कुलथे यांच्या फिर्यादीवरून २० जुलै २०२६ रोजी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सचिन कुलथे (वय २४, रा. बाजारतळ, कर्जत) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी महिला एका लहान मुलाला सोबत घेऊन दुकानात आल्या होत्या.

महिलांनी चांदीचे वाळे मागितले. त्याचवेळी दुकानात अन्य ग्राहक चांदीचे पैंजण पाहत होते. कर्मचारी अजीम झारेकरी हे ग्राहकांना पैंजण दाखवत असताना, संधी साधून लाल रंगाची साडी परिधान केलेल्या एका महिलेने पैंजणांचा गठ्ठा उचलून तो दुकानातच मागे उभ्या असलेल्या निळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या महिलेकडे दिला. त्यानंतर दोन्ही महिला दुकानाबाहेर निघून गेल्या. काही वेळाने दुकानातील पैंजणांची संख्या कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये महिलांनी अंदाजे १० ते १२ जोड चांदीचे पैंजण लंपास केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिसांच्या विशेष पथकाने तपास करत संशयित महिला चोरट्यांचा शोध घेतला आणि त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. या महिलांकडून इतर ठिकाणी अशाच प्रकारे करण्यात आलेल्या चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या धाडसी चोरीचा छडा लावल्याबद्दल सुरेश काका सराफ अँड सन्सचे संचालक सचिन शेठ कुलथे व ओम कुलथे यांनी पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड तसेच कर्जत पोलिसांच्या पथकाचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय तोरडमल उपस्थित होते.

यावेळी बोलताना सचिन कुलथे म्हणाले, “चोरीचा तपास लावण्यासाठी कर्जत पोलिसांनी विशेष मेहनत घेतली. महिला चोरट्यांचा शोध लावल्याबद्दल पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो.” आपण अनेक वेळा पाहतो की सीसीटीव्ही मध्ये आरोपी दिसतात मात्र ते सापडत नाही त्यातली त्यात महिला आरोपींना शोधणे हे अतिशय अवघड काम पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : डीजे वाजवल्यास मंडळासह चालकावरही गुन्हा; नगर तालुका पोलिसांचा...

0
नगर । तालुका प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याचे...