Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCrime : मंदिरात चोरी करणारी टोळी गजाआड

Crime : मंदिरात चोरी करणारी टोळी गजाआड

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

सिन्नर-लासलगाव-वाडीवर्‍हे व निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंदिरांमध्ये चोरी करून पितळी भांडे व चांदीचे दागिने चोरी करणार्‍या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेकडून सापळा रचून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांकडून 66 किलोच्या पितळी वस्तू व सव्वा किलो चांदी हस्तगत करण्यात आली आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्हयात गतवर्षी व चालु वर्षात सिन्नर, लासलगाव, निफाड, वाडीवर्‍हे पोलीस ठाणे हद्दीमध्ये मंदिर चोरीचे गुन्हे घडलेले होते. सदर मंदिरातून चोरीच्या गुन्हयांमध्ये आरोपी हे सी.सी.टी.व्ही. कॅमेरर्‍यांचे डिव्हीआर मशिन देखील चोरी करून घेवून जात होते. यातील आरोपी हे गावांतील पुरातन मंदिरांवर लक्ष केंद्रीत करून मंदिरातील चांदी व पितळी धातूंच्या किंमती वस्तू चोरी करत असे, तसेच चोरी केल्यानंतर घटनास्थळावर कोणाताही पुरावा ठेवत नव्हते. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखा ही समांतर तपास करत होती.

मंदिर चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या पथकाने घटनास्थळांवर मिळून आलेल्या तांत्रिक बाबींचे अचूक विश्लेषण करून मिळविलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदरचे गुन्हे हे संगमनेर तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी केले असल्याची माहिती हाती आली. त्यावरून पथकाने चाकण एम.आय.डी.सी. जि. पुणे व टिटवाळा, ता. कल्याण जि. ठाणे परिसरातून सुयोग अशोक दवंगे (21) रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, संदिप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे (23) रा. टिटवाळा, अनिकेत अनिल कदम (23) रा. आरके नगर, ता. कल्याण, संदिप किसन साबळे, रा. पाचपट्टा ता. अकोले, दिपक विलास पाटेकर, रा. टिटवाळा यातील आरोपी दवंगे, गोडे व कदम यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी नाशिक जिल्हयात आपल्या साथीदारांच्या मदतीने मंदिर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून मंदिर चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. पथकाने सातही गुन्हयांमध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात 238 ग्रॅमचा 27 हजारांचा वजनाचा चांदीचा मुकूट, 1 किलो वजनाच्या एक लाखांच्या दोन चांदीच्या प्लेट, 20 किलो वजनाचा पितळी कळस, 03 मोठया समई, मंदिरातील 06 पितळी घंटा, 1 छोटी पितळी समई, 1 पितळी घोडा, तसेच मंदिरांमधील पितळ व तांब्याच्या छोटया वस्तू अशा सुमारे 66 किलो वजनाच्या 66 हजार 290 रुपयांच्या पितळी 1 लाख 27 हजारांची 1238 ग्रॅम चांदी असा एकुण 1 लाख 93 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपींविरूध्द यापुर्वी अहिल्यानगर व नाशिक ग्रामीण जिल्हयात गुन्हे दाखल असून त्यांचेकडून मंदिर चोरी व घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपींना वाडीवर्‍हे पोलीसांनी अटक केली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, संदिप नागपुरे यांच्या पथकाने केली.

टोळी प्रमुख इंजीनियरिंग विद्यार्थी
ताब्यात घेतलेला आरोपी सुयोग दवंगे हा सराईत गुन्हेगार असून तो टोळी प्रमुख आहे. तो सध्या मॅकेनिकल इंजिनियरींगच्या दुसर्‍या वर्षाला शिक्षण घेत होता. सदर आरोपी हे गुगल मॅपवर ग्रामीण भागातील पुरातन मंदिरे सर्च करून त्यांची पाहणी करून चोरी करत होते. तसेच युटयुबवर कुलूप तोडण्याचे व्हिडीओ बघून हायड्रोलीक कटरच्या सहाय्याने कुलूप कट करत असल्याचे उघडकीस आलेले आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बनावट दूध प्रकरणात एका रात्रीत सात संशयित गजाआड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फक्राबाद (ता. जामखेड) येथे उघडकीस आलेल्या बनावट दूध निर्मिती प्रकरणाच्या तपासाला स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) नवे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी...