Saturday, October 3, 2026
Homeनाशिकगंगासागर तलाव भरला

गंगासागर तलाव भरला

त्र्यंंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

- Advertisement -

येथे काल रात्रीपासून संततधार सुरू असल्याने या पावसामुळे शहरातील गंगासागर तलाव भरून ओसंडत आहे. तर परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

येथील , अहिल्या, अंबोली, बेझे धरण भरल्याने जादा पाणी गंगापूर धरणाकडे प्रवाहीत झालेले आहेत. त्यामुळे गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रदक्षिणामार्गातील वैतरणा व उपनद्यांना देखील पाणी आले असल्याने भविकाना हा मार्ग आकर्षिक करणारा ठरणार आहे,. संतंतधार पावसाने त्रंबकेश्वर येथील गंगासागर ओव्हर फ्लो झाला आहे. तीन वर्षानंतर प्रथमच हा तलाव भरून वाहत आहे सिताराम बाबा आश्रम ते सूर्यनारायण मंदिर या भागात रस्त्यावर पाणीच पाणी असल्याचे चित्र होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : महिनाभरातच नववधूचे बिंग फुटले, चार मुलांची आई असल्याचे उघड

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत मुंबईतील एका एजंट महिलेने राहुरी तालुक्यातील तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखवून त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. मोठ्या...