Tuesday, July 16, 2024
Homeजळगावगोलाणी संकुलातील बंद पडलेल्या लिफ्टमधील कचर्‍याला आग

गोलाणी संकुलातील बंद पडलेल्या लिफ्टमधील कचर्‍याला आग

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

- Advertisement -

शहरातील गोलाणी मार्केटमध्ये (Golani Market) प्रत्येक विंगमध्ये लिफ्ट (lift) बसविण्यात आली आहे. परंतु त्याची देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे या लिफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून बंदच (closed) आहे. दरमयान, मार्केटमधील व्यापार्‍यांनी (Use of lift space by traders) या लिफ्टच्या जागेचा वापर हा कचराकुंडी (trash can) म्हणून करीत असून याठिकाणी दुसर्‍या मजल्यापर्यंत कचरा (Garbage piled up) साचलेला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास आग (fire) लागली. परंतु मनपाच्या अग्निशमन विभागाने (Municipal fire department) तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने त्यांनी आग (Fire under control) आटोक्यात आणली.

ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन म्हणतात तरुणांनी राजकारणात यावे!

शहरतील मध्यवर्ती भागात महापालिकेच्या मागच्या बाजूला महापालिकेकडून पाच मजली गोलाणी मार्केट बांधण्यात आले. या मार्केटमध्ये हजारो व्यापारी गाळे असून रहिवाशांसाठी देखील रेसीडेयन्सची देखील सुविधा तयार करण्यात आली होती. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात हे पहिले पाच मजली मार्केट असल्याने याठिकाणी प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट देखील तयार करण्यात आली होती. तसेच प्रत्येक विंगमध्ये फायरची सुविधा देखील लावण्यात आली होती. परंतु काही वर्ष ही लिफ्ट सुरळीत चालली त्यानंतर सर्वच विंगमधील लिफ्ट हळूहळू बंद पडल्या. त्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांकडून बंद पडलेल्या लिफ्टच्या जागेचा वापर हा कचरा टाकण्यासाठी होवू लागला आहे.

फेकरी रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघातनाडगाव येथील १९ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या

देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे अवस्था दयनीय

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केट हे सुविधांनी सज्ज होते. त्यामुळे शहरातील अनेक व्यापार्‍यांनी याठिकाणी दुकाने घेतली होती. परंतु काही वर्षांनंतर मार्केटमधील देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला. अनेक वर्षांपासून या मार्केटची देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे सद्याच्यास्थितीत मार्केटची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

Photo # गाढेगाव येथील ओढयावर पक्षी निरीक्षण कार्यक्रमात ४५ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद दुःखाचा डोंगर डोक्यावर घेऊन हिमांशूने केले नेव्ही मर्चंटमध्ये पदार्पण

पैशांअभावी साफसफाईचा मक्ता रद्द

महापालिकेच्या कर्मचार्‍यांकडून मार्केटमध्ये साफसफाई केली जात नसल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. दरम्यान, काही वर्षांपासून तत्कालीन जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी संपुर्ण मार्केटची पाहणी केली. त्यांना येथे प्रचंड घाण दिसल्याने त्यांनी महापालिकेच्या कर्मचार्‍यांकडून साफसफाई करुन घेतली. तसेच या मार्केटची साफसफाईचा मक्ता देखील देण्यात आला होता. परंतु व्यापार्‍यांकडून साफसफाई पोटी दिली जाणारी रक्कम मिळत नसल्याने तो मक्ता देखील रद्द झाला. त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुसर्‍या मजल्यापर्यंत कचर्‍याने तुडुंंब भरल्या लिफ्ट

गोलाणी मार्केटमध्ये हजारो व्यापारी गाळे आहेत. तळमल्यावर भाजीपाला व फळ विक्रेत्यांना ओटे बांधून दिले असून वरच्या तीन मजल्यांवर शासकीय, खासगी कार्यालये, मोबाईल व साहित्यासह अन्य दुकाने आहे. याठिकाणाहून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. व्यापारी हा कचरा कचरा कुंडीत न टाकता तो थेट लिफ्टमध्ये टाकत असल्याने याठिकाणावरील लिफ्ट या कचर्‍याने तुंडुंब भरल्या आहे.

…तर भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता

शहरातील गोलाणी मार्केटच्या चारही बाजूने बंदिस्त आहे. तसेच याठिकाणी पार्कींगच्या जागेत अनेकांनी अतिक्रमण केले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास गोलाणी मार्केटच्या लिफ्टमधील कचर्‍याला आग लागली. अग्निशमन विभागाच्या पथकाने लागलीच धाव घेत ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, भविष्यात मार्केच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यास तिथपर्यंत यंत्रणा पोहचू शकत नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या