Tuesday, March 25, 2025
Homeनगरकचरा गाडीत टाकले गोवंशीय जनावरांचे गर्भ

कचरा गाडीत टाकले गोवंशीय जनावरांचे गर्भ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गर्भवती असलेल्या गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोवंशीय पाच मृत अर्भक महापालिकेच्या कचरा गाडीत टाकल्याची घटना मंगळवारी दुपारी समोर आली. रामवाडी येथे घंटागाडीतून कॉम्पॅक्टरमध्ये कचरा ट्रान्सफर करत असताना हा प्रकार लक्ष्यात आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

महापालिकेचे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक भरतसिंग रमेशसिंग सारवान यांनी फिर्याद दिली आहे. झेंडीगेट परिसरात कचरा संकलन झाल्यानंतर मनपाची कचरा संकलन करणारी घंटागाडी रामवाडी परिसरात आल्यानंतर गाडीतील कचरा मोठ्या वाहनात भरला जात होता. यावेळी गोवंशीय जनावरांचे पाच मृत अर्भक गोणीत बांधून त्यात टाकले असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. पोलीस व मनपा अधिकार्‍यांना याची माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते दिगंबर गेंट्याल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सदर वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सारवान हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार विलास लोणारे अधिक तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...