धुळे । प्रतिनिधी dhule
मुंबई – आग्रा महामार्गावर (Mumbai – Agra Highway) मालेगावहून (Malegaon) भोपाळच्या (Bhopal) दिशेने कपड्याच्या गठाणी घेऊन जाणार्या ट्रकने धुळ्यानजीक लळिंग घाटात अचानक पेट घेतला. काहीवेळेतच आगीने (fire) रौद्ररुप धारण केल्याने ट्रकसह माल जळून खाक झाला. यात लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मालेगाहून मध्य प्रदेशातील भोपाळच्या दिशेने कपड्याच्या गठाणी घेवून ट्रकचालक जात होता. पहाटे पावणेतीन वाजता ट्रकला मागील बाजुस अचानक आग लागली. आगीने रुद्ररुप धारण केले. महामार्गावर आग लागल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली. आगीबाबत धुळे अग्नीशमन दलास माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी मनपा अग्नीशमन दलाचे बंब आले. त्यांनी आग नियंत्रणात आणली. रस्ता अरूंद असल्याने यावेळी बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
आग नियंत्रणात आल्यावर रस्त्यावर कपड्याच्या गठाणींचे ढिग ठिकठिकाणी पडले होते. या आगीत ट्रकसह कपड्याच्या गठाणी जळून खाक झाले. यात लाखो नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, लळींग टोलचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रस्त्यावरील वाहतुक सुरळीत केली. याबाबत मोहाडी पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली.