Friday, April 25, 2025
Homeक्राईमगॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे मागितली 10 लाखाची खंडणी

गॅस कंपनीच्या ठेकेदाराकडे मागितली 10 लाखाची खंडणी

हातपाय तोडण्याची धमकी || दोघांंविरूध्द पोलिसात गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एमआयडीसीत गॅस पाईपलाईनचे कामकाज चालू करायचे असेल तर 10 लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणून ठेकेदाराकडे खंडणीची मागणी करणार्‍या दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीपीसीएल गॅस पाईपलाईनचे ठेकेदार अंकित पारस पिचा (वय 30 हल्ली रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

सोमनाथ कराळे (पूर्ण नाव नाही, रा. नागापूर, अहिल्यानगर) व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे 5 ऑक्टोबर रोजी कामानिमित्त एमआयडीसीतील कार्यालयाच्याबाहेर उभे असताना सोमनाथ तेथे आला. तो फिर्यादीला म्हणाला, ‘गॅस पाईपलाईनचे कॉन्ट्रक्टर तुम्हीच का?, तुम्हाला एमआयडीसीमध्ये गॅस पाईपलाईनचे कामकाज करायचे असेल तर 10 लाख रुपये द्यावे लागतील, तुम्हाला माझ्या परवानगीशिवाय कामकाज चालू करता येणार नाही’. तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाले, ‘तुम्हाला पैसे का द्यायचे’. त्यानंतर सोमनाथने फिर्यादीला शिवीगाळ करून ‘मी या गावचा दादा आहे, तु मला पैसे दिले नाही तर मी तुझे कामकाज चालू देणार नाही तसेच तुझ्या कामगारांना मारहाण करून त्यांना पळवून लावेल’ असे म्हणून तो तेथून निघून गेला.

22 ऑक्टोबर रोजी सकाळी फिर्यादी व त्यांचे कामगार एमआयडीसी येथे काम करत असताना एक अनोळखी इसम तेथे आला व फिर्यादीला म्हणाला, ‘तुम्हाला सोमनाथ कराळे यांनी कामकाज बंद करण्यास सांगितले असून कामकाज जर चालू केले तर वाईट परिणाम होतील’ अशी धमकी दिली. त्याने त्याच्या मोबाईलवरून सोमनाथला फोन लावला व त्याने फोनवरून फिर्यादीला पुन्हा धमकी दिली की, ‘तुम्ही 10 लाख रुपये द्या, नाहीतर तुमचे कामकाज चालू देणार नाही’. त्यानंतर अनोळखी इसमाने फिर्यादी व त्यांच्या कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करून जर पुन्हा कामकाज चालू केले तर हातपाय तोडून टाकीन अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार जी. के. पालवे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...