Wednesday, May 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलासलगावला गॅस सिलेंडरचा स्फोट

लासलगावला गॅस सिलेंडरचा स्फोट

सुदैवाने पाच जण थोडक्यात बचावले; संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

लासलगाव येथील सोहन नगर परिसरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत पत्र्याच्या घरासह घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने घरातील पाच जण थोडक्यात बचावले आहेत. प्रचंड उकाड्यामुळे घरातील सदस्य घराबाहेर झाडाखाली बसले असल्याने मोठी जीवितहानी टळली.

- Advertisement -

सोहन नगर येथील शंकर खैरे यांच्या पत्र्याच्या घरामध्ये अचानक गॅस सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात दूरवर ऐकू गेल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. स्फोट इतका तीव्र होता की घरातील भांडी, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे परिसरातील काही झाडेही जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे आणखी मोठा अनर्थ टळला.

या घटनेमुळे सोहन नगर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : झेडपी प्रशासन नव्याने बदल्यांचे वेळापत्रक तयार करणार !

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जनगणनेच्या कामासाठी यंदा बहुतांश जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना जबाबदारी दिल्याने त्यांच्या बदली प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या वर्षी सरकारच्या सुचनेनूसार जनगणनेचे कामे...