नाशिक | प्रतिनिधी | Nashik
उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेनेच्या (shiv sena) निष्ठावंतांचा मेळावा सातपूरच्या (satpur) सौभाग्य लॉन्स येथे आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यातून ‘इमान भगव्याशी निष्ठा ठाकरेशी’या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
शिवगर्जना या उपक्रमांतर्गत रविवारी सकाळी 10 वाजता सातपूरच्या सौभाग्य लाँन्स येथे निष्ठावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी ‘इमान भगव्याशी निष्ठा ठाकरेंशी’ ही टॅग लाईन ठेवण्यात आली आहे.
या मेळाव्यात शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते (Former Union Minister Anant Gite), माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी (Former Deputy Speaker Vijay Auty), शिवसेना उपनेते व प्रवक्त्या संचना धाडी व युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Youth Sena Secretary Varun Sardesai) हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
शिवप्रमींनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन उपनेते बबनराव घोलप, सुनिल बागुल, सहसंपर्क नेते दत्ताजी गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख विनायक पांडे, माजी गटनेते विलास शिंदे, कोअर कमिटी पदाधिकारी डीजी सूर्यवंशी व पदाधिकार्यांनी केले आहे.