Sunday, September 22, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक शहरात जमावबंदीचे आदेश

नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

पोलीस आयुक्तांनी परिपत्रक जारी करत शहरात 30 जानेवारी रात्री 12 ते 13 फेब्रुवारी 2023 च्या रात्री १२ वाजेपर्यंत १५ दिवसांकरिता जमावबंदी आदेश( Gathering Prohibition order) लागू केला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे ( Commissioner of Police Ankush Shinde) यांनी परिपत्रक जारी करून मनाई आदेश लागू केला आहे.

नाशिक शहरात विविध राजकिय पक्ष, सामाजिक संघटना, कामगार संघटना या मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे, उपोषण आंदोलने करत असतात. तसेच भाविक धार्मिक सण, यात्रा, जत्रा व इतर कार्यक्रमाचे आयोजन करतात. अशा परिस्थितीत राज्यातील कायदा व सुव्यवस्था विषयक आयुक्तालय कार्यक्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते.

विरोधक व सत्ताधारी पक्षात सत्ता स्थापनेवरून पक्षात फुट पडल्याचे कारणांवरून एकमेकांविषयी होत असलेले आरोप व प्रत्यारोप चालु आहेत. तसेच नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुक साठी २९ डिसेंबर 2022 पासुन आदर्श आचार सहिंता सुरू असून उद्या (दि.30) मतदान होणार आहे.

तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तर 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव देखील होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे आदेश लागू करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या