नाशिक | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Nationalist Congress Party) नाशिक शहर विद्यार्थी शहराध्यक्ष ॲड. गौरव गोवर्धने (Adv. Gaurav Govardhan) यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nationalist Youth Congress) प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
Nashik Crime News : धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या; संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार विक्रम काळे आदी उपस्थित होते…
Niphad News : करवाढ मागे घेण्यासाठी नागरिकांचे उपोषण
ॲड. गौरव गोवर्धने हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष स्थापनेपासून पक्षात कार्यरत असून त्यांनी विविध पदावर सक्रीय काम केले आहे. करोना काळात कोविड सेंटर, सामाजिक कार्य, युवक व विद्यार्थी प्रश्नांच्या न्याय हक्कासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलने, महाविद्यालयीन प्रश्न व निवडणुका अशा विविध बाबतीत गोवर्धने अग्रेसर असल्याने त्यांनी पक्ष वाढीकरिता केलेले काम व पक्षावरील निष्ठा बघता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष तटकरे व युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी गोवर्धने यांची रायुकाँच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी (North Maharashtra Presidency) वर्णी लावली.
Sharad Pawar : “माझं वय झालं म्हणता, तुम्ही माझं…”; शरद पवारांनी वयावरून टीका करणाऱ्यांना सुनावलं
दरम्यान, यावेळी गोवर्धने यांनी उत्तर महाराष्ट्र विभागातील ५ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करून जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यात येईल. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये युवकांचा सक्रीय सहभाग असेल असे प्रतिपादन केले. तर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी ॲड. गौरव गोवर्धने यांना नियुक्तीबद्दल अभिनंदन करून राजकीय (Political) वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Nawab Malik : शरद पवार की अजित पवार, कोणासोबत जाणार? नवाब मलिकांनी स्पष्टच सांगितलं