Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशमुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

अदानी समूहाचे (Adani Group) संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मोठा धक्का दिलाय. अदानी हे आता अंबानींपेक्षा श्रीमंत झाले आहेत. विशेष म्हणजे केवळ भारतात नाही तर अदानी हे आशियामधील (Asia’s richest person) सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये अंबानींच्या एक स्थान वर म्हणजेच पहिल्या स्थानी पोहचलेत.

- Advertisement -

अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी हे तब्बल ८८.५ अब्ज डॉलर्स (भारतीय चलनात ६,६३,७५० कोटी) इतक्या प्रचंड संपत्तीसह आशियातील सर्वाधिक श्रीमंत होण्याचा बहुमान मिळवला आहे. मागील अनेक वर्ष या पदावर निर्विवाद वर्चस्व असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना गौतम अदानींनी मात दिली.

अंबानींची एकून संपत्ती ही ८७.९ बिलीयन डॉलर्स इतकी आहे. अदानींच्या खासगी संपत्तीमध्ये १२ बिलीयन डॉलर्सची वाढ झाली असून ते यंदाच्या वर्षातील सर्वाधिक संपत्ती वाढ झालेले श्रीमंत व्यक्ती ठरलेत. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये गौतम अदानी यांनी अंबानी यांना मात दिली होती.

अदानी समूहाच्या खाण प्रकल्पाला ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) मोठा विरोध झाला. तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गपासून (Greta Thunberg) अनेकांनी या खाण प्रकल्पांना विरोध केल्याने अदानी समूहाबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार झाली.

मात्र अदानींनी केवळ खनिजांवर लक्ष केंद्रीत न करता हरित ऊर्जा क्षेत्रामध्येही काम केलं. त्यांनी विमानतळ, डेटा सेंटर्स, शस्त्रनिर्मीती उद्योग यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करुन वाटचाल सुरु ठेवली.

गौतम अदानी यांचा जन्म गुजरातच्या (Gujrat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) २४ जून १९६२ मध्ये झाला. अदानी यांचे सहा भाऊ-बहिण आहेत. अहमदाबादच्या पोल परिसरातील शेठ चाळीत ते राहत होते. गुजरात यूनिवर्सिटीतून (Gujarat University) बी कॉम (B com) पूर्ण न करता ते मुंबईला आले. आणि याठिकाणी त्यांनी डायमंड सॉर्टर म्हणून व्यवसायाला सुरूवात केली.

काही वर्षात मुंबईच्या झवेरी बाजारात गौतम अदानी यांनी स्वत:ची डायमंड ब्रोकरेज फर्म सुरू केली. त्यानंतर मुंबईत काही काळ घालवल्यानंतर ते पुन्हा भावाच्या पॅल्स्टिक फॅक्टरी काम करण्यासाठी अहमदाबादला आले. याठिकाणी पीवीसी म्हणजे पॉलिविनाइल क्लारोइड इंपोर्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ग्लोबल ट्रेडिंगमध्ये एन्ट्री घेतली. प्लॅस्टिक बनवण्यासाठी पीवीसीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

पीवीसी Import मध्ये प्रगती झाली आणि १९८८ मध्ये अदानी ग्रुप पॉवर आणि एग्री कमोडिटीची अधिकृतपणे स्थापना झाली. १९९१ मध्ये आर्थिक सुधारणांमुळे अदानी ग्रुपला प्रचंड फायदा झाला आणि ते आंतरराष्ट्रीय उद्योजक बनले.

१९९५ गौतम अदानी यांच्यासाठी यशस्वी वर्ष ठरलं. जेव्हा त्यांच्या कंपनीला मुद्रा पोर्टचं व्यवस्थापन करण्याचं कंत्राट मिळालं. त्यानंतर गौतम अदानींनी त्यांच्या व्यवसायात विविधता आणली.

१९९६ मध्ये अदानी पॉवर लिमिटेड अस्तित्वात आली त्यानंतर १० वर्षात कंपनी पॉवर जनरेशनच्या उद्योगात उतरली. गौतम अदानी यांचा व्यवसाय अनेक क्षेत्रात पसरला आहे. कोळसा खदानीचे ते सर्वात मोठं ठेकेदार मानले जातात.

आता गौतम अदानी यांची नजर सिमेंट कारखान्यापासून ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोड कंस्ट्रक्शन, डिफेन्स प्रोडक्शन आणि रेल्वेवर आहे. अदानींनी ६-७ छोट्या रेल्वे लाईन एकत्रित करून रेल्वे ट्रक मॅनेजमेंट कंपनी बनवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या